कृषी

50 Hajar Protsahan Anudan : शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना ! आता यामुळे 50 हजार प्रोत्साहन अनुदान तब्बल ‘इतके’ महिने पडले लांबणीवर

Published by
Ajay Patil

50 Hajar Protsahan Anudan : मित्रांनो गेल्या ठाकरे सरकारने सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम राज्यातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी केली. कर्जमाफी केल्यानंतर गत ठाकरे सरकारने ज्या शेतकरी बांधवांनी नियमित पीक कर्जाचे परतफेड केली आहे अशा शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला.

नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन पर अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्या ठाकरे सरकारने घेतला. निर्णय घेतल्यानंतर राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली.

लॉकडाऊन मधून निस्तारल्यानंतर प्रोत्साहन पर अनुदानाचा मुद्दा फारच थंडावला. वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी हा मुद्दा उचलून धरला मात्र शासनाने या मुद्द्यावर गांभीर्याने लक्ष घातले नाही. शासनाच्या तिजोरीत पैशांचा खळखळाट होता यामुळे हे अनुदान रखडले असल्याचे जाणकारांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात सत्ताबदल झाला नवीन शिंदे सरकार राज्यात आले. सत्तेत आल्यानंतर शिंदे सरकारने गेल्या ठाकरे सरकारचे अनेक निर्णय रद्दबातल करण्यास सुरुवात केली. मात्र शिंदे सरकारने शेतकरी हिताचा प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय कायम ठेवला. आता प्रोत्साहन अनुदानाची घोषणा होऊन अडीच वर्षे उलटल्यानंतर शेतकऱ्यांना प्रत्यक्षात अनुदान मिळू लागले आहे. या अनुदानासाठी पात्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी सार्वजनिक झाली असून लाभार्थी यादी मधील आधार प्रामाणिकरण केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली आहे.

दरम्यान आता दुसरी यादी जिल्हा अन्वये टप्प्याटप्प्याने सार्वजनिक होत आहे. नुकतेच काल-परवा बीड जिल्ह्यातील पर अनुदानासाठी पात्र असलेल्या लाभार्थी शेतकरी बांधवांची दुसरी यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली. दुसऱ्या यादीत असलेल्या शेतकरी बांधवांना आपल्या नावासमोर असलेल्या विशिष्ट क्रमांकसह आधार प्रामाणिकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र आता पुन्हा एकदा प्रोत्साहन पर अनुदान लटकणार असल्याचे चित्र आहे.

मित्रांना जसं की आपणास ठाऊकच आहे महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशा परिस्थितीत राज्यात आता आचारसंहिता लागू होणार आहे. आचार सहिता लागू झाल्यानंतर कोणत्याच नागरिकांना आर्थिक लाभ दिला जात नाही. अशा परिस्थितीत प्रोत्साहन पर अनुदान पुन्हा एकदा लांबणीवर पडणार असल्याचे चित्र आहे. मित्रांनो आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी सार्वजनिक झाली आहे मात्र बीड जिल्ह्यातही बहुतांशी गावात ग्रामपंचायत इलेक्शन सुरू होणार आहे.

यामुळे यादी सार्वजनिक झाली असली तरी देखील शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लाभ मिळण्यास वेळ लागणार आहे. दरम्यान ज्या जिल्ह्यात ग्रामपंचायत इलेक्शन सुरू होणार आहे त्या जिल्ह्यातील प्रोत्साहन पर अनुदानासाठी लाखो पात्र शेतकरी बांधवांना आता अनुदान मिळवण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, आता प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र असलेल्या ज्या शेतकरी बांधवांना अजून अनुदान मिळालेले नाही अशा शेतकरी बांधवांना आता दोन महिन्यानंतरच अनुदान मिळण्याची शक्यता आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil