कृषी

50 Hajar Protsahan Anudan : ब्रेकिंग बातमी ! प्रोत्साहन अनुदानाच्या पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना 20 ऑक्टोबर रोजी मिळणार 50 हजार, मुख्यमंत्री शिंदे करणार शुभारंभ

Published by
Ajay Patil

50 Hajar Protsahan Anudan : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाच्या (Subsidy) लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या (Yojana) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे.

विशेष म्हणजे पहिल्या यादीत आठ लाखाहून अधिक शेतकरी बांधवांच्या नावांचा समावेश आहे. प्रोत्साहनपर अनुदानाचा (Anudan) लाभ घेण्यासाठी मायबाप शासनाने (Maharashtra Government) आधार प्रमाणीकरण बंधनकारक केले आहे.

आधार प्रमाणीकरण करण्यासाठी यादीमध्ये नाव असलेल्या शेतकरी बांधवांना यादीमध्ये देण्यात आलेला विशिष्ट क्रमांक तसेच आपले आधार कार्ड घेऊन जवळच्या आपले सेवा केंद्रवर जाऊन आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार शासनाच्या आवाहनाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून आतापर्यंत पहिल्या यादीत समाविष्ट असलेल्या सात लाख शेतकरी बांधवांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. दरम्यान या योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे.

मित्रांनो मीडिया रिपोर्टमध्ये केलेल्या दाव्यानुसार प्रोत्साहनपर अनुदानाच्या पहिल्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या पात्र शेतकरी बांधवांना 20 ऑक्टोबर रोजी 50 हजार रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणाहून अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्याचा शुभारंभ होणार आहे.

याबाबत सहकार मंत्री अतुल सावे यांनी स्वतः माहिती दिली आहे. म्हणजेच गेल्या अडीच वर्षांपासून शेतकरी बांधव जा प्रोत्साहनपर अनुदान याची आतुरतेने वाट पाहत आहे ते प्रोत्साहनपर अनुदान 20 ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता ज्या शेतकरी बांधवांनी आधार प्रमाणीकरण केले आहे अशा शेतकरी बांधवांना 20 ऑक्टोबर रोजी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अर्थात डीबीटी द्वारे पैसे खात्यात मिळणार आहेत.

सदर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात वर्ग केली जाणार आहे. यामुळे बँकांना कर्जापोटी ही रक्कम वजा करता येणार नाही. निश्चितच या अनुदानाचा पुरेपूर लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शासनाने प्रयत्न केले आहेत.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, गेल्या महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणवीस अंतर्गत राज्यातील शेतकरी बांधवांची दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली होती. या कर्जमाफी दरम्यान नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाईल असे देखील त्यावेळी सरकारने स्पष्ट केलं होत.

सरकारने त्यावेळी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाणार असं सांगितलं होत. मात्र तदनंतर कोरोना आणि त्यानंतर राजकीय घडामोडींमुळे प्रोत्साहनपर अनुदान लांबणीवर पडले.

आता राज्यात या सरकारने अनुदानाची घोषणा केली होती ते सरकार पडले असून आता अनुदानाच्या घोषणेच्या तब्बल अडीच वर्षानंतर नवोदित शिंदे सरकारने अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी अंमलबजावणी सुरू केली आहे. शेतकरी बांधवांना आता अडीच वर्षानंतर या योजनेचा लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार, प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ 2017 18 2018 19 2019 20 या तीन वर्षापैकी किमान दोन वर्षाची कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.

अनुदान देण्याच्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली असून 20 ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम वर्ग होणार आहे. गुरुवारी या अनुदान योजनेचा शुभारंभ कार्यक्रम मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमादरम्यान प्रोत्साहनपर अनुदानाच्या पात्र शेतकऱ्यांपैकी शेतकरी बांधवांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

Ajay Patil