50 Hajar Protsahan Anudan : 2019 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी सरकार उदयास आले. सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
त्यावेळी हा विकासासाठी सरकारने ज्या शेतकरी बांधवांनी पीक कर्जाची नियमित परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन देण्याचा प्लॅन आखला अन अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याचीं घोषणा केली.
घोषणा झाली मात्र याची अंमलबजावणी तब्बल अडीच वर्षानंतर ती पण सत्ता परिवर्तनानंतर झाली आहे. ठाकरे सरकारचा निर्णय शिंदे सरकारच्या कार्यकाळात सत्तेत उतरत आहे. शिंदे सरकारने 2017 18, 2018 19, 2019 20 या कालावधीत पीक कर्ज घेतलेल्या आणि किमान दोन वर्ष नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50000 पर्यंतचे प्रोत्साहन अनुदान प्रत्यक्षात देण्यास सुरुवात केली आहे.
या अनुदानाच्या पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी पोर्टलवर अपलोड झाली आहे, त्या यादीतील विशिष्ट क्रमांकसह ज्या शेतकरी बांधवांनी आधार प्रमाणीकरण केल आहे त्या शेतकऱ्यांना अनुदानाची प्रत्यक्ष रक्कम मिळाली आहे. पहिली यादी जाहीर झाल्यानंतर आता शेतकरी बांधव दुसरी यादीची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान महाराष्ट्रात ग्रामपंचायता निवडणुका सुरू असल्याने आचारसंहिताच्या पार्श्वभूमीवर प्रोत्साहनपर अनुदानाला ब्रेक लागला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आता प्रोत्साहन पर अनुदानाबाबत शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे.
एका मीडिया रिपोर्टनुसार, शासन दरबारी ज्या गावात ग्रामपंचायत इलेक्शन सुरु नाहीत त्या गावातील पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. विशेष म्हणजे सरकारकडून याबाबत माहिती मागविण्यात आली असल्याचे या मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू असते अशा परिस्थितीत आचारसंहिता लागू असलेल्या भागात कोणत्याच विकास कामांचे तसेच योजनेची अंमलबजावणी होत नाही.
याला प्रलोभण म्हणून निवडणूक आयोगाकडून प्रतिबंधित करण्यात आले आहे. यामुळे प्रोत्साहन पर अनुदान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडले आहे. मात्र आता ज्या गावात इलेक्शन सुरूच नाही अशा गावातील पात्र शेतकऱ्यांना अनुदान दिलं जावं याबाबत चर्चा सुरू आहे. यासाठी हालचाली देखील तीव्र झाल्या आहेत.
या अनुषंगाने सातारा जिल्हा सहकार विभागाकडून गावनीहाय नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या मागवल्या जात आहेत. निश्चितच आता प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी केव्हा येते आणि उर्वरित शेतकऱ्यांना केव्हा अनुदान मिळतं याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.