कृषी

50 Hajar Protsahan Anudan Yadi : आताची सर्वात मोठी बातमी ! सर्व जिल्ह्यातील 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी जाहीर, इथे PDF डाउनलोड करा

Published by
Ajay Patil

50 Hajar Protsahan Anudan Yadi : गेल्या महाविकास आघाडी सरकारने 2019 मध्ये राज्यातील शेतकरी बांधवांची महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफी केली होती. सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्यावेळी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने राज्यातील नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

या अनुषंगाने शेतकरी बांधवांना 50 हजार रुपये पर्यंतची मदत देण्याचे ठरवले. मात्र तदनंतर राज्यात कोरोना आला आणि नंतर राज्यात सत्ता बदल झाला, यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानासाठी बराच काळ वाट पहावी लागली. दरम्यान आता तब्बल अडीच वर्षानंतर शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान दिले जात आहे. मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांनी 2017 18, 2018 19, 2019 20 या तीन वर्षांपैकी किमान दोन वर्ष नियमित पीक कर्जाची परतफेड केली आहे.

अशा शेतकरी बांधवांना प्रोत्साहन स्वरूप अनुदान म्हणून 50 हजार रुपयांची मदत शासनाकडून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे अनुदानाची पहिली यादी 12 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली असून ज्या शेतकरी बांधवांनी आधार प्रामाणिकरण केले आहे त्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन पर अनुदान वर्ग करण्यात आले आहे. राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांना दिवाळी आधी प्रोत्साहन पर अनुदानाचा लाभ दिला गेला असला तरीदेखील पहिल्या यादीतील ज्या शेतकरी बांधवांचे आधार प्रमाणीकरण राहिले आहे अशा शेतकरी बांधवांना आता टप्प्याटप्प्याने अनुदान मिळत आहे.

आता महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन पर अनुदानाची दुसरी यादी देखील महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मित्रांनो काल दुपारी प्रोत्साहन पर अनुदानाची दुसरी यादी सार्वजनिक झाली आहे. खरं पाहता प्रोत्साहन पर अनुदानाची दुसरी यादी एक नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणार होती. मात्र, दुसरी यादी 4 नोव्हेंबर रोजी दुपारी सार्वजनिक झाली आहे.

आता दुसऱ्या यादीत ज्या शेतकरी बांधवांची नावे समाविष्ट असतील त्यांना देखील आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदानाच्या दुसऱ्या यादीत ज्या शेतकरी बांधवांची नावे समाविष्ट असतील त्यांना यादि मध्ये दिलेल्या विशिष्ट क्रमांकासह आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे. आधार प्रामाणिकरण करण्यासाठी शेतकरी बांधवांना यादीमध्ये दिलेला विशिष्ट क्रमांक आणि आधार कार्ड घेऊन सीएससी सेंटरला भेट द्यावी लागणार आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की शासनाकडून जिल्हानिहाय प्रोत्साहन पर अनुदानाच्या पात्र शेतकरी बांधवांच्या याद्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जात आहेत. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या याद्या सार्वजनिक झाल्या असल्या तरी देखील अजून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यातील याद्या पोर्टलवर आलेल्या नाहीत, मात्र शासनाकडून लवकरच सर्व जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या दुसऱ्या याद्या सार्वजनिक होणार आहेत.

प्रोत्साहन पर अनुदानाच्या दुसऱ्या यादीत नाव कसं शोधायचं 

शेतकरी बांधवांना आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, प्रोत्साहन पर अनुदानाची यादी केवळ सीएससी सेंटर धारक व्यक्तींनाच पाहता येणार आहे. म्हणजे जो व्यक्ती सीएससी सेंटर चालवतो त्यांनाच या याद्या पाहता येणार आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना दुसऱ्या यादीत आपले नाव शोधण्यासाठी आधार कार्ड घेऊन जवळच्या सीएससी सेंटर अर्थातच आपले सेवा केंद्रला भेट द्यावी लागणार आहे.

यानंतर सीएससी सेंटर चालक सीएससी पोर्टलला लॉगिन करेल. लॉग इन केल्यानंतर सीएससी सेंटर चालकाला महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असं टाईप कराव लागणार आहे. त्यानंतर तिथे एक लिंक येईल, त्या लिंक वर क्लिक करून महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागणार आहे.

अधिकृत संकेतस्थळावर ज्या शेतकरी बांधवांचे नाव शोधायचे आहे त्या शेतकरी बांधवांचा आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांचे दुसऱ्या यादीत नाव आहे की नाही हे शोधता येणार आहे. आधार क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर लोन अकाउंट हिस्टरी मध्ये सदर शेतकऱ्यांचे नाव आहे की नाही हे चेक करता येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी खालीलप्रमाणे :-

PUNE_Khed_Adgaon_VKList_2_2022-11-03

PUNE_Junnar_Pargaon Tarf Madh_VKList_2_2022-11-03

PUNE_Khed_Amboli_VKList_2_2022-11-03

PUNE_Khed_Bursewadi_VKList_2_2022-11-03

PUNE_Khed_Gundalwadi_VKList_2_2022-11-03

PUNE_Khed_Moroshi_VKList_2_2022-11-03

PUNE_Khed_Palu_VKList_2_2022-11-03

PUNE_Khed_Pangari_VKList_2_2022-11-03

PUNE_Mulshi_Shere_VKList_2_2022-11-03

PUNE_Mulshi_Man_VKList_2_2022-11-03

PUNE_Mawal_Patan_VKList_2_2022-11-03

PUNE_Mawal_Chandkhed_VKList_2_2022-11-03

PUNE_Mawal_Boraj_VKList_2_2022-11-03

PUNE_Khed_Shirgaon_VKList_2_2022-11-03

PUNE_Khed_Shelgaon_VKList_2_2022-11-03

Ajay Patil

Published by
Ajay Patil