Farmer Success Story:- शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि त्या तंत्रज्ञानाच्या वापरातून विकसित झालेल्या पद्धती शेतीमध्ये अवलंबून वेगवेगळ्या पिकांची लागवड करू शेतकरी लाखोत नफा सध्या मिळवताना आपल्याला दिसून येत आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अनेक फळपिके व भाजीपाला पिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी अनोखी प्रगती केल्याचे आपल्याला दिसून येते व असे अनेक उदाहरणे आपल्याला सध्या दिसून येत आहेत.
परंपरागत शेती पिके आणि परंपरागत शेती करण्याच्या पद्धती आता काळाच्या ओघात मागे पडले आहे व आता त्यांची जागा नवनवीन पिकांनी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या शेती पद्धतीने घेतली आहे. त्यापुढे आता खऱ्या अर्थाने शेतीला व्यवसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे.
याच मुद्द्याला धरून जर आपण पुरंदर तालुक्यातील सिंगापूर या गावचे प्रगतिशील शेतकरी विद्याधर लवांडे यांची यशोगाथा बघितली तर त्यांनी तीन एकर अंजीर बागेतून 40 टन उत्पादन घेतले व तब्बल वीस लाख रुपयांचा नफा मिळवला आहे.
पुरंदर तालुक्यातील सिंगापूरच्या शेतकऱ्याने अंजीर शेतीतून मिळवला वीस लाख रुपयांचा नफा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुरंदर तालुक्यात असलेल्या सिंगापूर या गावचे प्रगतीशील शेतकरी विद्याधर दत्ता लवांडे हे कायम शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात व या प्रयोगाचा भाग म्हणून त्यांनी त्यांच्या शेतामध्ये अंजीर लागवड करण्याचा निर्णय घेतला व तब्बल तीन एकर क्षेत्रावर त्यांनी अंजीर लागवड केली.
आज त्यांनी या बागेतून 40 टन उत्पादन घेतले असून त्यातून वीस लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. विशेष म्हणजे त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने निर्यातक्षम आणि दर्जेदार अशा अंजिराचे उत्पादन घेतले व त्यातील दीडशे किलो अंजिराची निर्यात जर्मनीला केली आहे.
विद्याधर लवांडे यांच्याकडे वडीलोपार्जित आठ एकर शेती असून ते अगोदर पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. परंतु कालांतराने शेतीमधील परिस्थिती बदलली व तसे बदल विद्याधर लवांडे यांनी देखील शेतीमध्ये करून आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला. या तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी अंजीर लागवड करण्याचे धाडस केले व आज तीन एकर अंजीर लागवडीतून वीस लाखापर्यंत नफा मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.
त्यांनी तीन एकर क्षेत्रामध्ये पुरंदर या जातीची अंजिराची 320 झाडांची लागवड केली. अंजिराचा महत्त्वाचा असलेला खट्टा बहराची जूनमध्ये छाटणी करून त्याचे नियोजन केले व पाच महिन्यात त्यांना अंजिराचे उत्पादन मिळायला सुरुवात झाली.
त्यांना अंजिराचे एका झाडापासून 120 ते 130 किलो उत्पन्न मिळत असून सध्या एकरी 15 ते 16 टन अंजीर उत्पादन मिळत आहे. सध्या अंजिराला प्रति किलोला 90 ते 100 रुपये इतका दर मिळाला आहे.
अंजिराची मीठाबहार छाटणी असते महत्त्वाची
तसेच अंजिराच्या मिठाबार छाटणीचा कालावधी ऑगस्ट ते सप्टेंबर असतो.यानंतर या छाटणीनंतर साडेचार महिन्यानंतर फळ काढणीला येते. तेव्हा देखील अंजिराला 90 रुपये प्रमाणे दर मिळतो.
विद्याधर लवांडे हे बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून पॅकिंग करतात व प्रतवारीनुसार मालाची विक्री करतात. ते प्रामुख्याने अंजीर विक्रीकरिता पुणे तसेच मुंबई, कोल्हापूर, हैदराबाद, गुजरात तसेच दिल्ली इत्यादी ठिकाणी पाठवतात.
अशा पद्धतीने शेतीमध्ये जर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आणि प्रगत शेती पद्धती वापरल्या तर नक्कीच कमी क्षेत्रात देखील जास्तीत जास्त उत्पादन आणि लाखोत आर्थिक उत्पन्न मिळवणे शक्य होते हे आपल्याला विद्याधर लवांडे यांच्या उदाहरणावरून दिसून येते.