Agriculture News: बळीराजाला (Farmer) आपल्या देशाचा कणा का म्हणतात कारण की बळीराजा हा विपरीत परिस्थितीत देखील हार न मानता खंबीरपणे उभा राहतो आणि अख्ख्या जगाचे पालन पोषण करतो. बळीराजा अर्थातच शेतकरी किंवा कास्तकार कोणत्याही नावाने संबोधलं तरी याचं शेतकरी राजाच्या खांद्यावर जगाच्या पालनपोषणाची जबाबदारी असते आणि विशेष म्हणजे बळीराजा ती जबाबदारी अगदी यशस्वीरित्या, कमी संसाधनात पार पाडत आहे.
कमी संसाधन आहेत म्हणून रडत बसण्यापेक्षा बळीराजा कमी संसाधनाचा वापर करुन अगदी आधुनिक पद्धतीने शेती (Farming) करत आहे. खरं पाहता आता यांत्रिकीकरणाचा जमाना आला आहे शेतीमध्ये देखील यांत्रिकीकरणा शिवाय आता पर्याय उरलेला नाही. मात्र असे असले तरी प्रत्येक शेतकरी बांधवाला आधुनिक यंत्र खरेदी करता येणे शक्य नाही. त्यामुळे झालं असं कि प्रत्येकचं शेतकरी आता फळबाग लागवड (Orchard Planting) करीत नाही.
फळबाग लागवड केली म्हणजेच शेतकरी बांधवांना अगदी लावणीपासून ते काढणीपर्यंत आधुनिक यंत्रांची गरज असते. या परिस्थितीत अनेक अल्पभूधारक शेतकरी बांधव आजही पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत. मात्र सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) मोहोळ तालुक्याच्या एका शेतकऱ्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर एका फवारणी यंत्राची (Spray Machine) निर्मिती केली असून उत्पन्नवाढीचे अनुषंगाने द्राक्षे शेती (Grape Farming) सुरू केली आहे.
मोहोळ तालुक्यातील मौजे खुनेश्वर येथील ज्ञानेश्वर हरिदास चव्हाण या नवयुवक शेतकऱ्याने उत्पन्न (Farmer Income) वाढीच्या अनुषंगाने द्राक्षबाग लागवड केली आणि फवारणीसाठी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून जुगाडू पद्धतीने ब्लोअरची निर्मिती केली. या देशी ब्लोअरला त्यांनी नंदी ब्लोर असे नाव दिले आहे. या नंदी ब्लोअरच्या माध्यमातून ज्ञानेश्वर आपल्या द्राक्ष बागेत फवारणी करत आहेच शिवाय इतर पिकात देखील या ब्लोअरच्या माध्यमातून फवारणी शक्य आहे.
खरं पाहता बाजारात ब्लोर सात लाखांपर्यंत उपलब्ध असते, ज्ञानेश्वर यांनी एवढा मोठा पैसा खर्च न करता अवघ्या चाळीस हजारात या जुगाडू ब्लोअरची निर्मिती केली. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की ज्ञानेश्वर यांनी दोन वर्षांपूर्वी द्राक्ष बागेची दोन एकरात लागवड केली. मात्र फवारणी करण्यासाठी ज्ञानेश्वर यांना खूपच अधिक पैसे मोजावे लागत होते. शिवाय फवारणीसाठी वेळ देखील वाया जात होता. मग काय भारतीयांच्या रक्तारक्तात जुगाड बसला आहे, त्यांनी देखील जुगाड करण्याचा निर्णय घेतला.
ज्ञानेश्वर यांनी ब्लोअर तयार करण्याचे ठरवले आणि मोटारसायकलच्या जुन्या चाकांचा वापर तसेच लोखंडी अँगलचा वापर करीत केवळ पाच हजारात गाडा तयार केला, पाठीमागील बाजुस एसटीपी पंप बसवला. त्यापुढे 5 एचपीचे डिझेल इंजिन आणि दोनशे लिटर क्षमतेचा आडवा बॅरल ठेवला.
त्यामध्ये 20 एमएम ड्रीपच्या नळ्यांचा वापर केला. बाजारातून खरेदीकरुन फवारणीसाठी दोन्ही बाजुला चार-चार स्प्रे गन बसवले. यासाठी त्यांना 40 हजार रुपयांचा खर्च आला. विशेष म्हणजे या ब्लोअरला पुढे बैल जुंपण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणजेच बैलाच्या साह्याने आता फवारणी ज्ञानेश्वर करीत आहेत.