Agriculture News : भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेतीवर (Farming) आधारित आहे. मात्र देशातील शेतकरी बांधवांना (Farmer) अनेकदा शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे अतिशय नगण्य उत्पन्न (Farmer Income) मिळत असते.
यामुळे शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत असतो. मात्र जर शेतकरी बांधवांनी ज्यावेळी शेतमालाला कमी बाजारभाव मिळतो त्यावेळी शेतमालाची साठवणूक करून तेव्हा बाजारात तेजी असते तेव्हा शेतमाल विकल्यास त्यांना फायदा होऊ शकतो. मात्र अनेक शेतकरी बांधवांना धमाल साठवणे शक्य नसते कारण की त्यांना घरखर्चाला आवश्यक पैसा असतो.
अशा परिस्थितीत शेतमालाची काढणी झाल्यानंतर शेतकरी बांधव ताबडतोब शेतमाल विक्री करण्यास प्राधान्य देतात. यामुळे शेतकरी बांधवांना हजारो रुपयांच नुकसान सहन करावं लागतं. यामुळे शेतकरी बांधवांच्या सोयीसाठी राज्यात एक विशेष योजना (Yojana) कार्यान्वित आहे. या शेतकरी हिताच्या योजनेतून (Farmer Scheme) शेतकरी बांधवांना शेतमालाला तारण ठेवता येते आणि कर्ज (Agricultural Loan) घेता येते.
मित्रांनो ही योजना 1990-91 साली महाराष्ट्र राज्य कृषि पणन महामंडळाकडून सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या या शेतकरी हिताच्या योजनेला शेतमाल तारण योजना असे म्हणून देखील ओळखली जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतमाल तारण ठेवून शेतकऱ्यांना सुलभ कर्ज बाजार समिती प्रशासनाकडून पुरवले जाते.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन महामंडळ ही योजना राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबवत आहे. अशा परिस्थितीत आज आपण महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ यांच्याकडून राबवली जाणारी शेतमाल तारण कर्ज योजना नेमकी आहे तरी कशी? या योजनेचे स्वरूप नेमके कसे आहे? तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना कुठे संपर्क करावा लागेल? या विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
शेतमाल कृषी तारण कर्ज योजनेचे स्वरुप थोडक्यात :-
शेतमाल कृषी तारण कर्ज योजने अंतर्गत शेतकरी बांधवांना बाजार समितीच्या गोदामात तारण ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या 75 टक्के एवढी रक्कम कर्ज म्हणून उपलब्ध करून दिली जाते. ही कर्जाची रक्कम एकूण सहा महिन्याचा कालावधी साठी शेतकऱ्यांना उपलब्ध होते. म्हणजेचं शेतकरी बांधवांना सहा महिन्यात या कर्जाची परतफेड करायची असते. शेतमाल तारण ठेवून दिल्या जाणाऱ्या कर्जावर 6 टक्के व्याज आकारले जाते. मात्र हे कर्ज शेतकरी बांधवांना त्वरित मिळत असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होतो.
या कर्जाच सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी बांधवांच्या शेतमालाला गोदाम भाडे, विमा, देखरेख खर्च इत्यादी बसत नसतो. हा सर्व खर्च बाजार समिती उचलत असते.
या महिन्याच्या आत कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजार समितीला तीन टक्के व्याजाची सवलत दिली जाते.
तसेच राज्यातील ज्या बाजार समित्यां स्वता निधी उभारून तारण कर्ज योजना राबवतात त्यांच्यासाठी देखील तीन टक्के व्याजाची सवलत अनुदान म्हणून दिली जाते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी कुठे संपर्क करावा बर
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, शेतमाल कृषी तारण कर्ज योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधव आपल्या जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भेट देऊन या योजनेविषयी विचारपूस करू शकतात. तसेच कृषी पणन मंडळाची विभागीय कार्यालय येरवडा पुणे 6 येथे प्रत्यक्ष भेट देखील देऊ शकतात.
किंवा dsopune6@gmail.com या संकेतस्थळाला भेट देऊन या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊ शकतात. निश्चितचं महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ यांनी सुरू केलेली ही 1990 सालाची योजना शेतकऱ्यांसाठी आजही लाभप्रद ठरणारी आहे. यामुळे शेतकरी बांधवांना आपला शेतमाल कमी किमतीत न विकता जेव्हा बाजारात चांगला बाजारभाव मिळेल तेव्हा विकता येणार आहे.