कृषी

ऐकावे ते नवलंच…! आता पेट्रोल आणि डिझेलची गरजचं नाही..! चक्क माणसाच्या मुत्रावर चालणार ट्रॅक्टर, शेतकऱ्यांचा होणारं फायदा

Published by
Ajay Patil

Agricuture News: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे (Petrol Diesel Price) सगळेच चिंतेत आहेत. शेतकरी बांधवांना (Farmer) याचा सर्वाधिक फटका बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात कमालीची वाढ झाली आहे परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात (Farmer Income) दिवसेंदिवस घट घडून येत आहे. खालच्या वर्गापासून ते उच्च वर्गापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किमती सगळ्यांवर परिणाम करत आहेत. महागाई वाढण्यामागे हेही एक प्रमुख कारण आहे. आणि म्हणूनच सरकार आणि अनेक वाहन निर्मात्या कंपन्या तसेच पेट्रोलियम कंपन्या इंधन म्हणून दुसऱ्या पर्यायांवर काम करत आहेत.

मित्रांनो खरं पाहता मानवी लघवीची कमतरता तर कधीच होणार नाही. अशा परिस्थितीत जर मानवी लघवीचा इंधन म्हणून वापर झाला तर. कदाचित हे ऐकून तुम्हाला विचित्र वाटेल, मात्र येत्या काळात त्याचा इंधन म्हणून वापर होणारं आहे. ऑल रेडी अमेरीकन बेस एका कंपनीने याचा इंधन म्हणून वापर करायला सुरुवात केली असून ट्रॅक्टर मानवी लघवीच्या साह्याने चालवले गेले (Tractor Run On Human Urine) असल्याचा दावा केला जात आहे. निश्चितच मानवी लघवी इंधन म्हणून उपयोगात आणल्यास मानवी जीवन अधिक सुसह्य होईल.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, अमेरिकन कंपनी अमोगीने अमोनियावर चालणारा एक ट्रॅक्टर (Tractor) तयार केला आहे. आता तुम्ही म्हणाल अमोनिया अन आपल्या लघवीचा काय संबंध तर आम्ही आपणास सांगू इच्छितो आपल्या मूत्रात अमोनिया मुबलक प्रमाणात आढळतो. म्हणजेच आता मानवी लघवीच्या माध्यमातून ट्रॅक्टर चालवणे शक्य होणारं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे नेमके कसे होईल तर मग चला वेळ न दवडता याविषयीं जाणून घेऊया.

मित्रांनो खरं पाहता, कंपनीने अमोनिया तोडणारी अणुभट्टी बनवली आहे आणि त्यातून ऊर्जा निर्माण करण्यासाठी हायड्रोजनचा वापर कंपनीनें केला आहे. म्हणजेच, हे स्पष्ट आहे की आपण ट्रॅक्टर किंवा इतर कोणत्याही वाहनाच्या टाकीमध्ये मुतलं तर वाहन चालणार नाही, पुढे जाणार नाही, तर यासाठी एक प्रक्रिया करावी लागणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर मानवी लघवीत आढळणाऱ्या अमोनिया पासून आता वाहने चालवता येणे शक्य होणार आहे. एकंदरीत इंधन म्हणून वापरण्यापूर्वी मानवी लघवीला एक उपचार प्रक्रियेतून जावे लागेल आणि मग त्याचा इंधन म्हणून उपयोग होईल.

डीडब्ल्यूने आपल्या अहवालात सांगितले आहे की, लघवीचे अमोनियामध्ये रूपांतर करता येते, त्यातून ऊर्जा निर्माण करता येते. कंपनीने सध्या ट्रॅक्टरसह हा प्रयोग केला आहे, परंतु भविष्यात याच्या सहाय्याने सागरी मालवाहू जहाजे चालवायची आहेत. अनेक दशकांपासून उद्योगात अमोनियाचा वापर केला जात असल्याने, त्याच्या साठवणुकीसाठी आधीच पुरेशी व्यवस्था आहे. त्याच्या हाताळणी आणि वितरणासाठी साधने आधीच उपलब्ध आहेत. अमोनिया कार्बन डाय ऑक्साईड सोडत नसल्यामुळे आणि भरपूर ऊर्जा असल्याने, कार्बन मुक्त वाहतुकीसाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो.

Ajay Patil