कृषी

मोठी बातमी ! अहमदनगर जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी धान खरेदीला झाली सुरवात, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

Published by
Ajay Patil

Ahmednagar News : शासनाकडून हमीभावाने धान खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरु केली जातात. यामुळे खुल्या बाजारात शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवता येते आणि त्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळतो. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आदिवासी बहुलभागात धान खरेदी केंद्र बंद होते.

मात्र आता तालुक्यातील राजूर वं कोतुळ या ठिकाणी केंद्र सुरु झाले आहे. यामुळे तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. परिसरात हमीभाव खरेदी केंद्र बंद होती यामुळे खुल्या बाजारात शेतकरी बांधवांची पिळवणूक केली जात होती.

शेतमालाला उचित दर मिळत नव्हता. हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने उत्पादक मेटाकुटीला आला होता. पण आता पुन्हा सरकारी धान खरेदी केंद्र सुरु झाले असल्याने शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणार आहे. परिसरातील बहुतांशी शेतकरी बांधव भात पिकाची शेती करत असतात.

मात्र असे असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना प्रणित आघाडी सरकारने धान खरेदी केंद्र बंद ठेवली होती. परिणामी खाजगी आणि खुल्या बाजारात शेतकऱ्यांचा आर्थिक छळ झाला. यामुळे भात उत्पादकांची ही पिळवणूक लक्षात घेऊन आमदार वैभव पिचड यांनी खरेदी केंद्र पुन्हा सुरु केले जावे यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला.

पण आमदारांच्या या पाठपुराव्याला ठाकरे सरकारच्या काळात यश आले नाही. पण शिंदे फडणवीस सरकार राज्यात आल्यानंतर पिचड यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. आदिवासी विकास विभागाने याबाबत कारवाई करून तालुक्यात राजुर व कोतुळ या ठिकाणी धान खरेदी केंद्र पुन्हा पूर्ववत केले आहे.

यामुळे साहजिकच भात उत्पादकांचा भात हमीभावात खरेदी केला जाणार आहे, परिणामी त्यांचे होणारे नुकसान टळणार आहे. आमदार पिचड यांनी धान खरेदी केंद्र सुरू व्हावे या अनुषंगाने नोव्हेंबर 2020, ऑक्टोबर 2021, जानेवारी 2022, मे 2022 मध्ये आदिवासी विकास मंत्री, आयुक्त, सचिव इत्यादीना पत्र लिहुन याबाबत पाठपुरावा केला होता.

शेवटी यावर्षी त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. यामुळे तालुक्यातील भात उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Ajay Patil