Ahmednagar News : शेतकऱ्यांचे जीवन अस्मानी व सुलतानी संकटांनी अगदी काकुळतीला आले आहे. असे असले तरी शेतकरी पुन्हा ताकदीने उभा राहत आहे. परंतु त्याला पाहिजे अशी मदत तर मिळत नाहीच परंतु महागाईने त्यांचे कंबरडेच मात्र मोडत आहे.
आता शेतकरी आगामी खरीप हंगामाची तयारी करत असतानाच रासायनिक खताच्या भावात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून पुढारी मात्र प्रचारात मश्गुल झालेले दिसतायेत. त्यात गेल्या काही वर्षांत सततची वाढच होत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र बिघडत असल्याची स्थिती आहे.
नगर तालुक्यासह जिल्ह्यात खरिपाची पेरणी जून महिन्यात होत असली तरी मे महिन्यापासूनच खताची खरेदी होते. भावात मोठी वाढ झाल्याने आर्थिक झळ बसणार आहे.
डिझेल दरवाढ झाल्याने ट्रॅक्टरमार्फत होणारी शेती आंतरमशागतीचा खर्च वाढला आहे. प्रतिएकर तीनशे रुपयापर्यंत नांगरणीचा खर्च वाढला असून २ हजार रुपये प्रतिएकर नांगरणी झाली आहे.
तिरी पाळीसाठी एकरी दीडशे ते दोनशे रुपये अधिकचा खर्च करावा लागत आहे. शिवाय सोयाबीन काढणीचे दरही पाच हजार रुपये प्रति एकर झाल्याने शेतीचे बजेट बिघडणार आहे.
आर्थिक बजेट कोलमडणार
वाढत्या महागाईचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. खत, बियाणे, रोजगार, अन् मशागतीसाठी लागणारे यंत्र यांच्या किमती प्रचंड वाढत आहेत. त्यातुलनेत शेतमालाचे बाजारभाव स्थिर असल्याने शेतकऱ्याचे पैशांचे गणित हुकत आहे.
कांदा विकण्यास परवडेना म्हणून तो आहे असाच पडून आहे, सोयाबिनही साडेचार हजारांच्या पुढे जाईना. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतमालाचे बाजारभाव घटणारे अन् खर्च मात्र वाढतच असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट व्यवस्थित बस्तान दिसत नाही.
वाढलेले खत दर..
खताचे नाव जुने दर नवे दर
शेतकरी म्हणतात..
उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतमालाच्या बाजारभावात मात्र घट होत आहे. यामुळे शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकयांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. उत्पादन खर्चात सर्वात महत्त्वाचा घटक असणाऱ्या खताच्या भावातच वाढ होत असल्याने शेती क्षेत्र आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही असे शेतकरी म्हणत आहेत.