Ahmednagar News : शिक्षक होण्याचा नाद सोडून शेतीत करिअर केले ! अहमदनगरमधील युवकाने खरबूज शेतीतून कमावले लाखो रुपये

Ahmednagarlive24 office
Published:
Melon farming

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वारसा मोठा आहे. राज्यात अहमदनगरचा याबाबतीत नावलौकिक आहे. आता शेती क्षेत्रात देखील नवनवीन प्रयोग करत अहमदनगरमधील युवा, शेतकरी एक नवा आदर्श निर्माण करत आहेत. (Melon farming)

आता नोकरीच्या मागे धावणाऱ्या तरुणांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील वांगदरी येथील युवकाने एक आदर्श निर्माण केला आहे. शिक्षक होण्याचा नाद सोडून देत त्याने खरबूज शेतीतून लाखो रुपये कमावले. चेतन नागवडे असे या वांगदरी येथील पदवीधर युवकाचे नाव आहे.

चेतन याने शेतीत करिअर करण्याचा निर्णय घेत उन्हाळ्यात खरबूज, कलिंगड या झटपट येणाऱ्या पिकांकडे फोकस केला. यंदा खरबूज फळांना चांगला भाव मिळाला. अवघ्या ७० दिवसांत दोन एकरांत ७ लाख ७० हजार रुपये खरबूज पिकातून त्याला मिळाले.

चेतन नागवडे याचे बीएड झाले आहे. शिक्षक होऊन दरमहा ठरावीक पगार घेण्यापेक्षा वडिलोपार्जित सात एकर शेतीत पीक पॅटर्न बदलून शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने नियोजन केले. उन्हाळी कलिंगड, खरबूज हे पीक घेण्यावर भर दिला.

कोरोना काळापासून दरवर्षी सात एकर पैकी पन्नास टक्के क्षेत्रावर कलिंगड, खरबूज पीक घेण्याचा मास्टर प्लॅन त्याने तयार केला. या शेतीने चेतन नागवडे याची आर्थिक घडी बसविली. यावर्षी कांदा पीक घेतले. कांदा काढून त्या शेतात खरबुजाची दोन एकर क्षेत्रामध्ये लागवड केली.

त्याचे योग्य व्यवस्थापन केले. त्यातून ७० दिवसांत ३८ टन उत्पादन काढले. त्याला प्रतिकिलो २२ ते २६ रुपयांचा भाव मिळाला. दोन एकरांत ७ लाख ७० हजार एवढे उत्पन्न मिळाले. यातून चेतन नागवडे याच्या नियोजन व कष्टाचे चीज झाले.

नोकरी लागली तर काही वर्षे कमी पगारावर काम करावे लागते. शेतीत चांगले कष्ट, नियोजन केले तर निश्चितच आर्थिक फायदा होतो. पदवीधर असून शेतीत करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला यश आले ही समाधानाची बाब आहे असे चेतन म्हणतात.

तर नोकरीच्या मागे धावणारे किंवा हताश अवस्थेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा एक मोठा आदर्श आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe