Ahmednagar News : एक एकर खरबुजाने केले लखपती ! फक्त सेंद्रिय खतावर अहमदनगरमधील शेतकऱ्याची कमाल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा म्हटलं की त्याचा दक्षिण भाग हा नेहमीच दुष्काळी मानला जातो. दुष्काळी पट्ट्यात शेती करणे लय अवघड असते असे बोल आपण बऱ्याचदा तरुणांच्या तोंडून ऐकतो.

पण दुष्काळावरही मात करत आणि केवळ सेंद्रिय खतांच्या वापरावर शेती करत एक एकर खरबूज लागवडीतून अहमदनगरचे शेतकरी आबासाहेब विनायक लोखंडे यांनी तीन महिन्यात ३ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले. ते श्रीगोंदे तालुक्यातील घुगलवडगाव येथील रहिवासी आहेत.

गावात प्रथम खरबुजाची लागवड
आबासाहेब हे मागील ७ ते ८ वर्षांपासून त्यांच्या शेतात खरबूज या वेलवर्गीय फळ पिकाची लागवड करीत असतात.ऊस, हरभरा, कांदा अशा विविध पिकांची लागवड देखील ते करतात. दरवर्षी साधारण दोन टप्प्यांत खरबूज लागवड करतात. सुरुवातीला गावात प्रथम त्यांनी खरबुजाची लागवड केली.

खरबूज पिकावर झपाट्याने कीड रोगाचा प्रादुर्भाव होते. त्यामुळे खरबूज लागवड करणे तितके सोपे नाही. मात्र, आबासाहेब लोखंडे यांनी मागील ७ ते ८ वर्षांपासून खरबूज लागवडीत प्रयोगशीलता जपत सातत्य राखले आहे.

पाण्याची बचत करीत, त्यांनी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून खरबूज पिकाचे चांगले उत्पन्न मिळवले आहे. शिवाय काही शेतकरी भाजीपाला उत्पादनावरदेखील ते भर देत आहेत.

दुष्काळी स्थितीवर मात व सेंद्रिय खतांचा वापर
दरवर्षी ते ५ एकरांवर खरबुजाची लागवड करतात, परंतु यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने त्यांनी एक एकर खरबुजाची लागवड केली होती. कोणत्याही पद्धतीची कीटकनाशके व रासायनिक खतांचा वापर न करता,

सेंद्रिय खतांचा वापर करून त्यांनी तीन महिन्यांत ३ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. त्यांचे पीक पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने येत असतात.

एक एकरमधून भरघोस उत्पन्न
लोखंडे यांनी पहिल्या टप्यात अर्ध्या एकरामध्ये लागवड करण्याचे ठरविले. सध्या ते दरवर्षी दोन टप्यांमध्ये खरबूज लागवड करतात. अर्ध्या एकरापासून सुरुवात केलेली खरबूज लागवड आता पाच एकरांपर्यंत लोखंडे यांनी वाढवली होती,

परंतु यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे एक एकरावरच खरबुजाची लागवड केली. यंदाच्या हंगामात त्यांना एकरी सरासरी १६ ते १८ टन उत्पादन मिळाले असल्याची माहिती मिळाली आहे.