कृषी

शिक्षकीपेशा सांभाळून आष्टी तालुक्यातील शेतकऱ्याने 50 गुंठ्यात फुलवली जांभळाची शेती! हजारात खर्च करून कमावले लाखो

Published by
Ajay Patil

समाजामध्ये काही लोक आपल्याला अशा पद्धतीचे दिसून येतात की ते नोकरी आणि त्यासोबत इतर व्यवसाय देखील करतात. काहींचा तो छंद असतो तर काही व्यक्तींचे विशिष्ट अशी ध्येय असते व ते पूर्ण करण्यासाठी अशा पद्धतीने नोकरी आणि व्यवसाय याचे नियोजन केले जाते.

तसेच आपण पाहतो की असे अनेक व्यक्ती समाजामध्ये आपल्याला दिसून येतात की ते नोकरी देखील करतात व उत्तम अशी शेती देखील करतात. या दोन्ही बाजूची कमान सांभाळताना त्यांचे प्रचंड कष्ट करण्याची क्षमता तसेच ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले सातत्य व चिकाटी इत्यादी गुण फार महत्त्वाचे असतात.

अशा जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शिक्षकाची नोकरी सांभाळून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या केळसांगवी येथील अशोक पडोळे यांनी त्यांच्या 50 गुंठे शेतामध्ये जांभळाची शेती फुलवली असून त्या माध्यमातून ते लाखो रुपयांचे उत्पन्न देखील मिळवत आहेत.

 50 गुंठे क्षेत्रात फुलवली जांभळाची शेती

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या केळसांगवी या गावचे अशोक पडोळे हे  पाटोदा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी त्यांचा शिक्षकी पेशा सांभाळत आधुनिक शेती करण्याकडे मोठ्या प्रमाणावर भर दिला आहे.

या कामांमध्ये त्यांना त्यांच्या पत्नीची मोलाची मदत झाली असून त्यांच्या मदतीने त्यांनी 50 गुंठे क्षेत्रामध्ये जांभूळ शेती फुलवली असून कमीत कमी कष्टामध्ये शेतीतून चांगले लाखात उत्पन्न कसे मिळवता येते यासंबंधीचा आदर्श त्यांनी तरुण शेतकऱ्यांपुढे निर्माण केला आहे.

जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरी सुरू असताना त्यांनी आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला. याकरिता त्यांनी मित्रांशी चर्चा केली व या चर्चेतून जांभूळ शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

 अशी केली जांभूळ शेतीला सुरुवात

जेव्हा त्यांनी आधुनिक शेती करण्यासाठी मित्रांशी चर्चा केली व आधुनिक शेती कशी करावी याबाबत विचार केला तेव्हा जांभूळ शेती किंवा जांभूळ लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. याकरिता त्यांनी छत्तीसगड राज्यातून तीन वर्षा अगोदर 380 रोपे आणली व त्यांची बारा बाय दहा या अंतरावर लागवड केली.

तसेच या सर्व जांभूळ बागेला पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी शेततळे उभारले व त्यातून ड्रिपच्या मदतीने पाणी व्यवस्थापनाची सोय केली. त्यांनी या जांभूळ शेतीचे योग्य व्यवस्थापन ठेवले व पहिल्याच वर्षी एक टन उत्पादन मिळवले. हे जांभूळ त्यांनी अहमदनगर येथील बाजारपेठेमध्ये विकले व त्यांना 180 रुपये प्रति किलोचा दर मिळाला

व त्यातून त्यांना एक लाख 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये लाखोत उत्पन्न देणारी जांभूळ शेती त्यांना फायदा देऊन गेली. जांभूळ शेती ही कमी कष्टाची शेती असून अशोक पडोळे यांना त्यांच्या पत्नीची मोलाची मदत यामध्ये मिळाली व त्यामुळे त्यांना शाळा सांभाळून जांभळाची शेती यशस्वी करता आली व त्यातून लाखोचे आर्थिक उलाढाल देखील शक्य झाली.

Ajay Patil