शेतकरी आता निर्यातयोग्य उत्पादनावर भर देत असल्याचे आपल्याला दिसून येते व या दृष्टिकोनातून प्रामुख्याने फळ बागामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर काम करताना आपल्याला दिसतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि योग्य प्रमाणात केलेले व्यवस्थापन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर यश मिळवून देत आहे.
बदललेली नैसर्गिक परिस्थिती आणि हवामान बदल यासारख्या विपरीत परिस्थिती टिकाव धरत योग्य व्यवस्थापन आणि शेतकरी आता भरगोस फळ पिकांच्या माध्यमातून उत्पादन घेत असून लाखोत नफा मिळवत आहेत. केळी या पिकाच्या दृष्टिकोनातून बघितले तर जळगाव जिल्ह्याला केळीचे आगार म्हटले जाते व जळगाव जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
यामध्ये पाचोरा आणि भडगाव या परिसरात देखील गिरणा नदीच्या पाण्याची मुबलकता असल्यामुळे या ठिकाणी केळीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
याच भडगाव येथील राजेंद्र पाटील या शेतकऱ्याची जर आपण केळी उत्पादनाची किमया पाहिली तर या शेतकऱ्याने दर्जेदार अशा केळीचे उत्पादन घेतले व ते केळी थेट इराणाला निर्यात केलेली आहे. इतकेच नाही तर त्यांनी एकरी अव्वल उत्पादन घेण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर यश मिळवलेले आहे.
भडगावच्या राजेंद्र पाटील यांच्या शेतातील केळी पोहोचली इराणला
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील रहिवासी असलेले शेतकरी राजेंद्र पाटील यांनी त्यांच्या शेतामध्ये पिकवलेली केळी थेट इराणला निर्यात केली असून त्यांना या केळी पासून एकरी उत्पन्न देखील भरघोस पद्धतीचे मिळाले आहे.
सरासरी 35 ची रास पडली असून या केळीला प्रति क्विंटल 1751 रुपयांचा भाव मिळाला आहे. सध्या राजेंद्र पाटील यांच्या शेतातील बागेची काढणी सुरू असून या केळीला चांगली मागणी आहे व थेट शेतातून ही केळी इराणला रवाना करण्यात आलेली आहे.
राजेंद्र पाटील शेतीत करतात वेगवेगळे प्रयोग
राजेंद्र पाटील हे प्रयोगशील शेतकरी असून त्यांच्या शेतीमध्ये ते कायमच वेगवेगळे प्रयोग करत असतात. या केळीचे लागवड करण्यासाठी त्यांनी टिशूकल्चर रोपांचा वापर केला होता व त्यामुळेच त्यांनाही विक्रम उत्पादन घेता येणे शक्य झाले. सध्या त्यांच्या सहा एकर शेतीमध्ये 9000 टिशूकल्चर केळीच्या रोपांची लागवड त्यांनी केलेली होती व या केळीचे सध्या काढणी सुरू आहे.
त्यांची केळी थेट इराण या देशात निर्यात करण्यात आलेली असून यापासून त्यांना चांगला आर्थिक फायदा मिळालेला आहे. तसे पाहायला गेले तर साधारणपणे एका केळीच्या झाडाला वीस ते पंचवीस किलोचा केळीचा घड येत असतो. परंतु राजेंद्र पाटील यांचा शेतातील केळीच्या घडाचे वजन 32 ते 35 किलो पर्यंत आहे.
तसेच केळीला साधारणपणे १४०० ते १५०० रुपये प्रत्येक क्विंटलचा भाव मिळत असतो. परंतु राजेंद्र पाटील यांनी पिकवलेल्या केळीला तब्बल 1751 रुपयांचा भाव मिळत आहे.विशेष म्हणजे राजेंद्र पाटील यांनी या केळी उत्पादनासाठी रासायनिक खतांपेक्षा शेणखतावर मोठ्या प्रमाणावर भर दिला व हे विक्रमी उत्पादन पदरात पाडले.
त्यांच्या मते खतांचे आणि मशागतीचे उत्कृष्ट व्यवस्थापन ठेवल्यामुळे केळीचे हे विक्रमी उत्पन्न घेता येणे शक्य झाले. त्यांची ही केळी निर्यात करण्यासाठी भडगाव तालुक्यात असलेल्या कजगावचे केळी व्यापारी राहुल पाटील यांची त्यांना मोलाची मदत झाली.