कृषी

भले शाब्बास! महाराष्ट्रातील ‘या’ दूध उत्पादक महिलांना बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी मिळणार ‘इतकं’ अनुदान

Published by
Ajay Patil

Biogas Plant Subsidy : देशातील शेतकऱ्यांच्या आणि पशुपालकांच्या हितासाठी कायमच शासनाकडून वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. केंद्र शासनाकडून तसेच राज्य सरकारकडून या योजनेच्या माध्यमातून करांना वेगवेगळ्या बाबींसाठी अनुदान प्रोव्हाइड केलं जातं. राज्यात बायोगॅस प्लांट उभारणीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत आकारमानानुसार 70000 पर्यंतचे अनुदान लाभार्थ्यांना देऊ केल जाणार आहे. दरम्यान आता गोकुळ दूध संघाने देखील आपल्या सभासद महिला दूध उत्पादकांना बायोगॅस प्लांट उभारणीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

एनडीडीबी (मृदा), जिल्हा दूध संघ व सिस्टीमा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबवली जाणार आहे. याच्या माध्यमातून ‘गोकुळ’च्या दूध उत्पादक महिलांना बायोगॅस संयंत्र बसवण्यासाठी आर्थिक सहाय्य दिल जाणार आहे. विशेष म्हणजे कार्बन क्रेडिट योजनेंतर्गत तब्बल पाच हजार बायोगॅस प्लान्टची उभारणी या योजनेच्या माध्यमातून केली जाणार आहे.

याबाबत चेअरमन विश्वास पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली आहे. दूध संघाकडून राबवली जाणारी ही योजना डिसेंबर २०२३ पर्यंत चालवली जाणार आहे. यामुळे गोकुळच्या जास्तीत जास्त दूध उत्पादक महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.

बायोगॅस सयंत्राच्या माध्यमातून पशुपालकांना इंधन तर उपलब्ध होतच शिवाय यातून जी सलरी प्राप्त होते ती खत म्हणून पिकांच्या वाढीसाठी उपयोगात आणली जाऊ शकते. एकीकडे गॅसचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत, गरीब शेतकरी कुटुंबांना गॅस वापरणे आता अवाक्या बाहेरचं वाटू लागलं आहे. अशा परिस्थितीत गोकुळ दूध संघाची ही बायोगॅस प्लांट उभारणीची योजना निश्चितच गोकुळच्या दूध उत्पादक महिलांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

किती मिळणार अनुदान 

आम्ही आपणास सांगू इच्छितो की गोकुळच्या कार्बन क्रेडिट बायोगॅस योजनेंतर्गत २ घनमीटर क्षमतेच्या बायोगॅस प्लान्ट उभारणीसाठी ४१ हजार २६० रुपये खर्च येणार असल्याचे गृहीत धरून सहभागी महिलांना प्रतिलाभार्थी ३५ हजार २७० रुपये अनुदान उपलब्ध करून दिल जाणार आहे.

म्हणजेचं महिला दूध उत्पादकांनी या अनुदानाचा लाभ घेतल्यास त्यांना प्रत्यक्षात ५ हजार ९९० रुपयांत हा प्लान्ट उपलब्ध होणार आहे. या योजनेचा जवळपास ५ हजार लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. म्हणजे तब्बल १७ कोटी ६३ लाख ५० हजार रुपयांचा लाभ लाभार्थ्यांना होणार आहे.

२ घनमीटर क्षमतेच्या प्लान्टमुळे ६ माणसांचे छोट्या कुटुंबाचे प्रतिमहिना गॅसच्या एका सिलेंडरची बचत होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. निश्चितच या महिला दूध उत्पादकांना याचा मोठा फायदा होणार असून गॅसपासून मुक्ती मिळण्यास त्यांना मदत होणार आहे.

ज्या दूध उत्पादकांना या योजनेत सहभागी व्हायचे असेल त्यांना आपल्या प्राथमिक दूध संस्थेच्या माध्यमातून गोकुळकडे नावे नोंदवावी लागणार आहेत. निश्चितच गोकुळ दूध संघाची ही योजना कौतुकास्पद असून यामुळे 5000 कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. गोकुळ दूध संघाने इतर संघांसाठी दिशादर्शक असं काम केलं आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil