Business Idea : भारत हा शेतीप्रधान देश आहे. अशा या वेळी देशातील शेतकरी शेतातून वेगवेगळ्या पिकांची लागवड करून लाखो रुपये कमवत आहेत. जर तुमच्याकडेही शेती असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
कारण तागाची शेती करून शेतकरी मोठी कमाई करू शकतात. तागाखालील क्षेत्र वाढवण्यावर सरकारचा भर आहे. तागाच्या किमतीतही सरकारकडून वाढ करण्यात आली आहे. यामुळे ताग उत्पादक राज्यांतील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.
तागाबद्द्ल जाणून घ्या
गेल्या काही वर्षांत, ताग हा सर्वात उपयुक्त नैसर्गिक तंतू म्हणून उदयास आला आहे. गहू आणि मोहरीच्या काढणीनंतर मार्च ते एप्रिल दरम्यान तागाची पेरणी केली जाते. अशा परिस्थितीत ही वेळ तुमच्यासाठी चांगली संधी आहे. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यावेळी तागाचे पीक लावू शकता आणि मोठा पैसा मिळवू शकता.
या राज्यांमध्ये तागाची लागवड केली जाते
देशातील माती आणि हवामानानुसार काही विशेष पिके घेतली जातात. या पिकांमध्ये तागाचाही समावेश होतो. पूर्व भारतात शेतकरी तागाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. तर पश्चिम बंगाल, त्रिपुरा, ओडिशा, बिहार, आसाम, उत्तर प्रदेश आणि मेघालय या प्रमुख ताग उत्पादक राज्यांच्या यादीत समाविष्ट आहेत.
ताग पीक प्रामुख्याने देशातील सुमारे 100 जिल्ह्यांमध्ये घेतले जाते. केंद्र सरकारने तागाच्या किमतीत 6 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. जगातील ताग उत्पादनात भारताचा वाटा 50 टक्के आहे. जर विचार केला तर जास्त प्रमाणात तागाचे उत्पादन करणारे बांगलादेश, चीन आणि थायलंड हे देश आहेत.
ताग म्हणजे काय?
ताग हे नगदी पीक आहे. ताग एक लांब, मऊ आणि चमकदार वनस्पती आहे. त्याचे तंतू गोळा करून जाड धागा तयार केला जातो. याच्या मदतीने पिशव्या, बोरे, गालिचे, पडदे, सजावटीच्या वस्तू, टोपल्या पॅकिंगसाठी तयार केल्या जातात.
अन्नधान्य पॅकिंगसाठी वापरल्या जाणार्या गोण्या फक्त तागापासून बनवल्या जातात. तागाच्या रोपापासून लगदा तयार केला जातो. त्यातून कागद आणि खुर्च्या बनवता येतात. आजकाल तागाचीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत ताग पिकातून बंपर उत्पन्न मिळू शकते. म्हणून हा व्यवसाय तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.