कृषी

Business Idea : 30 हजारात ‘या’ फुलाची शेती सुरु करा, काही महिन्यातचं लाखोंची कमाई होणार

Published by
Ajay Patil

Business Idea : भारतातील बहुतांश भागात आता बाजारात मागणी असलेल्या पिकांची शेती (Farming) मोठ्या प्रमाणात केली जात आहे. फुलांची (Flower Crops) देखील बाजारात बारामाही मागणी असल्याने आता फुलाची लागवड (Flower Farming) करण्यासाठी शेतकरी बांधव आकृष्ट होत असल्याचे चित्र आहे.

विशेषत: खरीप हंगामात फुलांची लागवड (Floriculture) करून शेतकऱ्यांना दसरा-दिवाळीपर्यंत चांगले उत्पन्न मिळते. कमळ (Lotus Flower) हे देखील असंच एक फुल आहे. याच्या शेतीतुन शेतकऱ्यांना चांगली कमाई होऊ शकते. या फुलाची शेती शेतकऱ्यांना कमी खर्चात श्रीमंत बनवू शकते.

 

एवढेच नाही तर खरीप हंगामात कमळ पिकाची लागवड केल्यानंतर त्याची फुले, पाने आणि देठ झपाट्याने वाढतात. शेतकर्‍यांना हवे असल्यास ते कमी पाण्याच्या क्षेत्रात तलावाऐवजी शेतात कमळाचे पीक लावून कमी वेळेत व कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

शेतात कमळ लागवड करा चांगली कमाई होणारं 

कमी पाणी किंवा कमी पाऊस असलेल्या भागात देखील आता कमळ शेती (Lotus Farming) करता येऊ लागली आहे. यासाठी तलावाची गरज भासणार नाही, परंतु शेतातील जमिनीतच चांगली ओलावा निर्माण करून कमळाचे चांगले उत्पादन घेता येईल. याची शेती भाताच्या शेती प्रमाणे शेतात तलाव तयार करून केली जाऊ शकते.

कमळ शेती सुरू करण्यासाठी सर्वप्रथम पावसाळ्यात शेतांची व्यवस्थित नांगरणी करून शेतात पाणी अडवले जाते.

त्यासाठी शेतात उंच बंधारे तयार करून पावसाचे पाणी गोळा केले जाते, त्यामुळे चिखल तयार होतो. यानंतर कमळाचे अंकुरलेले बियाणे किंवा त्याची कटिंग लागवड केल्यास ऑक्टोबरपर्यंत चांगले उत्पादन घेता येते. शेतकर्‍यांना हवे असल्यास ते एक एकर जमिनीवर 5 ते 6 हजार कमळाची रोपे लागवड करू शकतात.

कमळ शेतीतून मिळणारे उत्पन्न नेमके किती 

कमळाच्या लागवडीसाठी प्रति एकर 25 ते 30 हजार रुपये खर्च येतो, ज्यामध्ये कमळाची रोपे आणि बियाणे किंवा कलमांद्वारे पुनर्रोपण केले जाऊ शकते.

जुलै-ऑगस्टमध्ये कमळाची लागवड केल्यावर ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत कमळाचे पीक तयार होते, ज्यापासून फुले, देठ आणि कमळ काकडीचे उत्पादन शेतकरी बांधवांना मिळत असते.

कमळ शेतीसोबत मत्स्यपालन करा उत्पन्न वाढणार 

कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पाण्याची उपलब्धता किंवा चांगला पाऊस असलेल्या राज्यांमध्ये कमळशेती सोबत मत्स्यपालन, ऑयस्टर फार्मिंग आणि कोळंबीपालन केले जाऊ शकते. याद्वारे मर्यादित स्त्रोतांमध्येही चांगले उत्पन्न मिळू शकते. फक्त पिके आणि मासे यांचे चांगले व्यवस्थापन आणि योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil