कृषी

Business Idea: अहो नोकरीपेक्षा जास्त शेतीतुन कमवा…! बाजारात कायम मागणीत असलेल्या ‘या’ विदेशी पिकाची शेती करा, करोडपतीचं बनणार

Published by
Ajay Patil

Business Idea: बदलत्या काळानुसार प्रत्येक व्यवसायात बदल घडवणे अतिशय महत्त्वाचे असते. मग तो व्यवसाय शेतीचा (Farming) का असेना. पारंपारिक पद्धतीने शेती केल्यास शेतकरी बांधवांना (Farmer) तोटा सहन करावा लागू शकतो त्यामुळे शेतीत आधुनिकतेची कास धरणे आणि नगदी पिकांची शेती (Cash Crop) करणे आता अत्यावश्यक बनत चालले आहे.

खरं पाहता आता शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळ्या संध्या देखील चालून येत आहेत. जसे की या आधुनिकीकरणाच्या जमान्यात खाण्यापिण्याच्या पद्धतीत मोठा बदल घडला आहे. आता विदेशी पदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जात आहे. यामुळे शेतकरी बांधवांना विदेशी भाजीपाला पिकांची शेती आता विशेष फायदेशीर ठरत आहे.

खरं पाहता खान-पानापासून ते शेतीपर्यंतच्या पद्धती आधुनिक झाल्या आहेत. शेतकरी बांधव देखील आता पारंपरिक पिकांऐवजी अशा पिकांची लागवड करत आहेत, ज्यांना जागतिक बाजारपेठेत जास्त मागणी आहे. अशा पिकांपासून शेतकऱ्यांना चांगला भाव तर मिळतोच, शिवाय नव्या युगातील शेती (Agriculture) समजून घेण्याची संधीही मिळते.

गेल्या काही वर्षांपासून भारतात ओरेगॅनोचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मोठं-मोठी हॉटेल्स असोत की छोटे स्टॉल्स, सर्वत्र पिझ्झा आणि पास्ताच्या वाढत्या मागणीमुळे ओरेगॅनोची मागणीही वाढत आहे. यामुळेच त्याची लागवड (Oregano Cultivation) शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

ओरेगॅनो नेमकं आहे तरी काय 

मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ओरेगॅनो हा केवळ चवीचा खजिनाच नाही तर औषध म्हणूनही वापरला जातो.  पूर्वी फक्त इटालियन पदार्थांमध्ये ओरेगॅनोचा वापर केला जात होता, मात्र भारतात परदेशी पदार्थांची वाढती मागणी पाहता आता आपल्याकडेही त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. यामुळे जेवणाची चव तर वाढतेच, पण हिवाळ्याच्या काळात आजारांपासूनही संरक्षण मिळते.  ओरेगॅनो ही पुदीना प्रजातीची सदस्य वनस्पती आहे, ज्यामध्ये अनेक प्रकार आहेत. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचेही हे एक चांगले साधन आहे.

ओरेगॅनोची व्यावसायिक शेती फायदेशीर ठरणार 

ओरेगॅनोच्या लागवडीसाठी, बागायती पिकांप्रमाणेच शेताची तयारी केली जाते. सुपीक जमिनीत ओरेगॅनोची लागवड अगदी सहज करता येते.

जर शेतकऱ्यांना हवे असेल तर ते ओरेगॅनोचे सह-पीक देखील म्हणजे अंतर-पीक घेऊ शकतात, कारण हे कमी कालावधीचे पीक आहे, जे पारंपारिक पिकांपेक्षा लवकर तयार होते.

औषधी वनस्पती असल्याने ओरेगॅनो पिकावर किडी व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नसते व कीड नियंत्रणाचा खर्चही वाचतो.

त्याची व्यावसायिक लागवड केल्याने देश-विदेशात त्याच्या उत्पादनाला चांगला भाव मिळतो.

त्याच वेळी, त्याच्या लागवडीसह, त्याचे प्रक्रिया युनिट स्थापन करून नफा अनेक पटींनी वाढतो, कारण ओरेगॅनो प्रक्रिया केलेली आणि पॅकेज केलेली उत्पादने लवकर निर्यात होतात.

हे वाळलेली पाने आणि तेल (Oregano Oil) म्हणून वापरले जाते. जेवणाची चव वाढवण्यापासून ते आरोग्याच्या रक्षणापर्यंत ओरेगॅनो कोणत्याही औषधी वनस्पतीपेक्षा कमी नाही.

Ajay Patil

Published by
Ajay Patil