शेतकऱ्यांसाठी बँकेतून मिळणारे पीक कर्ज हे खूप महत्त्वाचे असते. कारण मिळणाऱ्या या पिक कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीच्या संबंधित अनेक कामे वेळेवर पूर्ण करता येणे शक्य होते. परंतु हे पीक कर्ज घेताना शेतकऱ्यांना बऱ्याच कागदपत्रांची पूर्तता बँकेला करावी लागते व त्यानंतर कुठे शेतकऱ्यांच्या हातात पैसा पडतो.
या पिकं कर्जाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक महत्त्वाची बाब अशी होती की शेतकऱ्यांना पाचशे रुपयांच्या स्टॅम्प म्हणजेच मुद्रांक घ्यावा लागत होता व त्यावरच कर्ज मिळत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना हा मुद्रांक शुल्काचा भार सोसावा लागत होता.
परंतु आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत महत्वपूर्ण घोषणा केली असून त्या घोषणानुसार राज्यातील शेतकऱ्यांना आता एक लाख 60 हजार रुपयांपर्यंत कर्जाकरिता लागणारे आवश्यक मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेले आहे व एवढेच नाही तर त्यासंबंधीच्या आदेश देखील बँकांना देण्यात आले आहेत.
1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत कर्जासाठी मुद्रांक शुल्क माफ
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्यातील शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपये पर्यंत असलेल्या पीक कर्जाकरिता जे काही मुद्रांक शुल्क भरावे लागत होते ते आता माफ करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली असून त्यासंबंधीचे आदेश देखील बँकांना देण्यात आले आहेत.
त्यानुसार आता शेतकऱ्यांना पाचशे रुपयांच्या स्टॅम्पऐवजी एक रुपयाच्या तिकिटावर कर्ज मिळणे शक्य होणार आहे. जर शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज घ्यायचे असेल तर मुद्रांक शुल्काच्या रूपाने अतिरिक्त आर्थिक भार सोसावा लागत होता. अगोदरच्या प्रक्रियेमध्ये जर शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घ्यायचे असेल तर संबंधित बँकेच्या शाखेत किमान पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क घेऊन अर्ज करावा लागत होता.
परंतु आता मुख्यमंत्र्यांनी मुद्रांक शुल्क माफ केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांनी मुद्रांक शुल्क माफ गेल्यानंतर अनेक शेतकरी या निर्णयाची अंमलबजावणीची वाट पाहत होते व अखेरीस संबंधित बँक शाखांना त्या प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत.
या आदेशानुसार आता एक लाख साठ हजार रुपये पर्यंतच्या पीक कर्जाला लागणारे मुद्रांक शुल्क शेतकऱ्यांना भरावे लागणार नाही व त्यामुळे नक्की शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्क माफीच्या या घोषणेनुसार एक एप्रिल 2024 पासून नव्याने पीक कर्ज घेणाऱ्यांना मुद्रांक शुल्क माफ झाले आहे.
त्यानुसार आता कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. तर त्या ऐवजी एक रुपयाच्या रेव्हेन्यू तिकिटावर पीक कर्ज दिले जाईल व त्यासंबंधीचे आदेश देखील बँकांना मिळाले आहेत.