कृषी

Corn Variety: मक्याच्या ‘या’ व्हरायटीची लागवड देईल हेक्टरी विक्रमी उत्पादन व लाखात नफा! वाचा मक्याच्या भरघोस उत्पादन देणाऱ्या व्हरायटींची माहिती

Published by
Ajay Patil

Corn Variety:- मका हे एक महत्वपूर्ण पीक असून अनेक औद्योगिक उत्पादनांमध्ये मक्याचा कच्चा माल म्हणून वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो व त्यामुळे मक्याला बाजारात कायम चांगली मागणी असते व दर देखील चांगला मिळतो. महाराष्ट्र मध्ये खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये मक्याची लागवड केली जाते.

खरिपामध्ये कपाशी व सोयाबीननंतर मका हे एक महत्त्वाचे पीक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे शेतकरी बंधू मक्याच्या लागवडीकरिता दर्जेदार व  चांगले उत्पादन देणाऱ्या व्हरायटींची निवड करताना आपल्याला दिसून येतात.

तसे पाहायला गेले तर बाजारामध्ये मका बियाण्याच्या अनेक व्हरायटी आपल्याला दिसून येतात. परंतु त्यातून चांगल्या उत्पादनक्षम व्हरायटींची निवड करणे गरजेचे असते. या अनुषंगाने आपण मक्याच्या काही सुधारित व्हरायटींची माहिती बघू.

 मक्याच्या या सुधारित जाती देतील भरघोस उत्पादन

1- महाराजा मक्याच्या महाराजा या व्हरायटीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही लागवडीनंतर काढणीस लवकर तयार होते व सरासरी काढणीचा कालावधी 80 ते 90 दिवसांचा आहे. तसेच हेक्टरी उत्पादन बघितले तर ते 60 ते 65 क्विंटल पर्यंत मिळते.

2- राजश्री मक्याच्या राजश्री या व्हरायटीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे लागवडीनंतर सरासरी 90 ते 100 दिवसात काढणीस तयार होते. या व्हरायटीचा काढणीचा कालावधी हा मध्यम आहे. राजश्री या व्हरायटीपासून हेक्टरी 70 ते 75 क्विंटल पर्यंत दर्जेदार उत्पादन मिळू शकते.

3- बायो-9637- मक्याची ही व्हरायटी देखील मध्यम कालावधीत काढणीस तयार होणारी असून हेक्टरी 70 ते 75 क्विंटल उत्पादन देण्यास सक्षम आहे. साधारणपणे या व्हरायटीचा परिपक्वता कालावधी 90 ते 100 दिवसांचा असून महाराष्ट्र राज्यात लागवडीकरिता ही व्हरायटी अत्यंत फायदेशीर आहे.

4- फुले महर्षी मक्याची फुले महर्षी ही व्हरायटी लागवडीनंतर साधारणपणे 90 ते 100 दिवसात काढणीस तयार होते व या व्हरायटीच्या लागवडीतून एका हेक्टरमध्ये 75 ते 80 क्विंटल पर्यंत मक्याचे उत्पादन मिळू शकते.

5- विवेक संकरित मका 21- मक्याची ही व्हरायटी पावसाळ्यात लागवडीसाठी उपयुक्त आहे. लागवडीनंतर साधारणपणे 70 ते 80 दिवसात ती काढणीस तयार होते व या व्हरायटी पासून 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.

Ajay Patil