Cotton Farming : भारतात कापसाची (Cotton Crop) शेती विशेष उल्लेखनीय आहे. आपल्या राज्यात देखील कापसाचे उत्पादन मोठ्याप्रमाणात घेतल्या जात असून राज्यातील अनेक शेतकरी बांधवांचे (Farmer) कापूस या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे.
खरं पाहता, कापूस हे एक प्रमुख नगदी पीक (Cash Crop) असून या पिकाची शेती शेतकऱ्यांना बक्कळ पैसा (Farmer Income) मिळवून देत आहे. गेल्या वर्षी कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव (Cotton Rate) मिळाला असल्याने या वर्षी कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या (Cotton Grower Farmer) आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.
मात्र असे असले तरी कापूस पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी कापूस पिकासाठी घातक ठरणाऱ्या गुलाबी बोंड आळीवर (Pink Bollworm) वेळीच नियंत्रण (Pink Bollworm Control) मिळवावे लागणार आहे. मित्रांनो खरे पाहता गेल्या वर्षी कापसाला चांगला बाजारभाव मिळत होता यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी फरदड कापूस उत्पादन घेतले यामुळे गुलाबी बोंड आळीचा जीवनक्रम वाढला आहे.
अशा परिस्थितीत या हंगामात देखील गुलाबी बोंड अळी हमखास कापूस पिकावर थैमान माजवणार आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना (Cotton Crop Management) आतापासूनच करायला सुरुवात करावी लागणार आहे.
खरं पाहाता कापूस पिकासाठी घातक ठरणाऱ्या गुलाबी बोंड आळी वर प्राथमिक स्तरावरच नियंत्रण मिळवता येते. जेव्हा गुलाबी बोंड अळी अंड्यात असते किंवा जेव्हा गुलाबी बोंड आळी बारीक असते त्यावेळी तिच्यावर नियंत्रण मिळवता येते. एकदा गुलाबी बोंड आळी कापसाच्या बोंडात गेली म्हणजे या आळी वर नियंत्रण मिळवता येणे जवळपास अशक्य आहे. अशा परिस्थितीत गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण प्रायमरी स्टेजला करावे लागणार आहे.
गुलाबी बोंड आळी वर नियंत्रण मिळवण्याच्या पद्धती
गुलाबी बोंड आळी पतंग यावर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा गुलाबी बोंड आळीचा कापसाच्या पिकात किती प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे हे जाणून घेण्यासाठी एक जाणकार लोक कामगंध सापळे कापसाच्या पिकात लावण्याचा सल्ला देतात. एकरी सहा ते आठ कामगंध सापळे दीड ते दोन फूट उंचीवर लावले गेले पाहिजेत. कामगंध सापळे यामुळे गुलाबी बोंड अळी नियंत्रणात येते असा काही ठोस पुरावा नाही. मात्र असे असले तरी कापसाच्या पिकात गुलाबी बोंड अळीचा किती प्रादुर्भाव आहे हे यामुळे समजते. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कामगंध सापळ्यांचा वापर केला पाहिजे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, कापूस लागवड केल्यानंतर केलेल्या मशागतीमुळे जमिनीत गाडले गेलेले गुलाबी बोंड अळीचे कोष बाहेर येतात. बोंड अळीचे कोश बाहेर आले की, पाऊस पडताचं त्या कोशातून पतंग बाहेर येतात या पतंगाच्या आयुष्य दोन महिने असते. या दोन महिन्यात ज्या-ज्या अमावस्या येतात त्या-त्या अमावसेच्या दिवशी हे पतंग कापसाच्या पिकावर जाऊन अंडी घालतात. अशा परिस्थितीत गुलाबी बोंड आळीचा कापसाच्या पिकावर प्रादुर्भाव सुरू होतो.
सर्वप्रथम गुलाबी बोंड आळी वर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनी काही गोष्टींचा अंदाधुंद वापर टाळणे देखील अतिमहत्त्वाचे आहे. मित्रांनो आणि कापूस उत्पादक शेतकरी बांधव सांगतात की कापूस पिकाला जास्त युरिया देता कामा नये. युरिया दिल्याने कापूस पीक जोमात येते किंवा लुसलुशीत बनते आणि पुढे अनेक रोग कीटक अशा कापसावर अधिक प्रमाणात अटॅक करत असतात.
याशिवाय कापूस पिकासाठी एकच फवारणी पुन्हा पुन्हा घेऊ नये. मोनोक्रोटोफास तसेच असिफेट +इमिडा सारख्या औषधांची फवारणी आलटून पालटून करावी याशिवाय मोनो फवारणी करू नये. असे देखील सांगितले जाते की, नियोनिकोटींन गटातील कीटकनाशके पुन्हा पुन्हा फवारू नये त्यामुळे किडींची प्रतिकार क्षमता वाढते. गुलाबी बोंड आळीची रोगप्रतिकारक क्षमता वाढली म्हणजे यावर नियंत्रण मिळवता येणे जवळपास अशक्य आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी तज्ञ लोकांचा सल्ला घेऊन योग्य त्या कीटकनाशकांची तसेच औषधांची फवारणी कापूस पिकावर योग्य त्या वेळी करणे अतिशय आवश्यक राहणार आहे.
कापूस उत्पादक शेतकरी बांधव असे सांगतात की, मोनोक्रोटोफास तसेच असिफेट +इमिडा या औषधांची फवारणी मुळे कापसाच्या झाडाची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते अशा परिस्थितीत रोगराईचे सावट जास्त येण्याची भीती राहते. त्यामुळे अशा औषधांची शक्यतो फवारणी शेतकरी बांधवांनी टाळली पाहिजे.
आता जाणून घेऊया अमावस्येला केले जाणारे काम ज्यामुळे होईल बोंड आळीचं काम तमाम
मित्रांनो जसं की आपण आधी बघितला अमावस्याच्या दिवशी (किंवा अमावस्याच्या 3 ते चार दिवस मागे पुढे) गुलाबी बोंड अळीचे पतंग अंडी घालतात. आता गुलाबी बोंड अळीच्या पतंगांनी अंडी घातल्यानंतर जास्तीत जास्त चार दिवसांनी तर कमीत कमी 38 तासानी या अंड्यातून अळी बाहेर पडतात. अळी बाहेर पडल्यानंतर आपल्या डोळ्यांना दिसणे अशक्य आहे कारण की ती सूक्ष्म अळी असते.
आता ही अळी कापसाच्या फुलात शिरते, ही अळी फुलात गेल्यानंतर फुल आतून वळतात फुलांचा रंग फिकट जांभळट होतो. त्यानंतर तीन ते चार दिवसांनी ही अळी फुलांच्या आत असलेल्या लहान कापसाच्या बोंडात शिरते आणि तेथून पुढे ती आपला संपूर्ण जीवनप्रवास कापसाच्या बोंडात करते. यामुळे या अळीला गुलाबी बोंड आळी म्हणून ओळखले जाते. मित्रांनो ज्या मार्गाने कापसाच्या बोंडात किंवा कैरीत शिरते तो मार्ग कैरीच्या वाढीने तसेच गुलाबी बोंड अळीच्या विष्ठेने पूर्णपणे बंद होतो.
अशा परिस्थितीत गुलाबी बोंड अळी कापसाच्या कैरीत किंवा बोंडमध्ये असतानादेखील शेतकरी बांधवांना गुलाबी बोंड अळी दिसत नाही. अशा परिस्थितीत कापसाच्या बोंडातील शिरल्यानंतर या आळीला मारणे जवळपास अशक्य बनते. मित्रांनो या आळीचे आयुष्य 35 दिवसांचे असते. आता गुलाबी बोंड आळी मारण्यासाठी अमावसेचा दिवस का महत्वाचा आहे याचे वैज्ञानिक कारण जाणून घेऊया. मित्रांनो आपण गुलाबी बोंड आळी ला तेव्हाच मारू शकतो जेव्हा ती प्राथमिक अवस्थेत म्हणजे सूक्ष्म रूपात असते आपण गुलाबी बोंड अळीची अंडी नासवू शकतो. अशा परिस्थितीत पतंग अमावसेच्या दिवशी अंडी घालतात म्हणून आपण अमावस्येच्या आदल्या दिवशी निमार्क व स्प्रेडरची फवारणी करावी.
अमावस्येच्या 2/3 दिवसांनी खालील फवारणी करावी (प्रमाण 30 लिटर पाण्यासाठी)
खालील कोणतीही एक फवारणी करावी.
1)थोयोडीकार्ब 40 ग्रॅम ,
नीम अर्क 10000 30/40 मिली स्प्रेडर 10/14 मिली,
प्रोफेनोफॉस 80 मिली.
2) इमामेकटींन बेंझोइत 20 ग्रॅम,
स्प्रेडर 10/14 मिली,
निमार्क 30/40 मिली
सुपर प्रोफेक्स 80 मिली.
3) प्रोफेनोफॉस 80 मिली
डेसिस 50 मिली
नीम अर्क 30/40 मिली
स्टिकर 10 मिली
वरील प्रमाणे अमावस्ये नंतर 1 फवारणी केल्यावर 8 ते 10 दिवसांनी दुसरी खालीलपैकी कोणतीही एक फवारणी करावी.
1)थोयोडी कार्ब 60 ग्रॅम, क्लोरो 50% 70 मिली,
नीम अर्क 30/40 मिली ,
स्प्रेडर 10/14 मिली.
2) डायपेल 100 ते 120 मिली
क्लोरो 50%चे 70 मिली
निम अर्क 30/40 मिली,
स्प्रेडर 10/14 मिली.
3) डेसिस 50 मिली
नुवान 70 मिली
निमार्क 30/40 मिली
स्प्रेडर 10 मिली
वर सांगितलेले सर्व औषधे 30 लिटर पाण्यासाठी आहेत याची नोंद शेतकरी बांधवांनी घ्यावी. 30 लिटर पाणी म्हणजेच जवळपास दोन पंपांसाठी हा अंदाज दिला गेला आहे.
शेतकरी बंधूंनो कोणत्याही परिस्थितीत प्रोफेनोफॉस, क्लोरोपायरीफॉस, लगातार 2 वेळा फवारू नका त्यामुळे कापूस पिकाची पाने पिवळी पडून पानगळ होते.
मित्रांनो येथे दिलेली माहिती ही कोणत्याही स्वरूपात अंतिम राहणार नाही यासाठी तज्ञ लोकांचा सल्ला अतिशय आवश्यक राहणार आहे. कोणत्याही पिकावर कोणत्याही औषधाची फवारणी करण्या अगोदर तज्ञ लोकांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे अपरिहार्य राहणार आहे.