Cow Farming Tips : दुग्धव्यवसायात (Dairy Farming) जास्त दूध देणाऱ्या जातींना जास्त मागणी आहे. पशुपालक (Livestock Farmer) देखील जास्त दूध देणाऱ्या जातींना निवडण्यास प्राधान्य देतात. अधिक दूध उत्पादन मिळावे या अनुषंगाने पशुपालक शेतकरी बांधव (Farmer) संकरित किंवा विदेशी जाती निवडण्यास प्राधान्य देतात.
परदेशी जातींपैकी जर्सी गाय (Jersey Cow Rearing) ही आपल्या देशात सर्वाधिक पाळली जाते. ही जात अधिक दुधासाठी ओळखली जाणारी गायीची विदेशी जात आहे. प्रोग्रेसिव्ह डेअरी प्रॅक्टिशनर्स आणि पशुवैद्यक देखील जर्सी गाईची जात (Cow Breed) ठेवण्याची शिफारस करतात.
जर्सी गाय वर एक नजर
जर्सी ही ब्रिटीश बोवाइन गाय आहे. युरोपमध्ये असलेल्या जर्सी बेटावरून हे नाव देण्यात आले आहे. जर्सी गायींसाठी थंड हवामान चांगले असते. जर्सी गाय बॉश टोरसच्या श्रेणीत येते जी देशी गायीपेक्षा (Cow Rearing) जास्त दूध देते.
जर्सी गाय ओळख
जर्सी गायची वैशिष्ट्ये
जर्सी गायी दरवर्षी सुमारे 4 हजार ते 5 हजार लिटर दूध देतात.
ही गाय दररोज 15 ते 20 लिटर दूध देते.
या जातीच्या गायीच्या दुधात 4.5 टक्के फॅट असते.
जर्सी गायी 13 ते 14 महिन्यांच्या अंतराने वासराला जन्म देऊ शकतात.
एक गाय आपल्या आयुष्यात 8 ते 10 वासरांना जन्म देऊ शकते.
जर्सी गाय किंमत
जर्सी गायीची किंमत तिची दूध देण्याची क्षमता, आरोग्य आणि वय यावर अवलंबून असते. भारतीय बाजारपेठेत या जातीच्या गायीची किंमत (Jersey Cow Price) 20 हजार रुपयांपासून ते 80 हजार रुपयांपर्यंत आहे. वासराच्या जन्मानंतर जर्सी गाय खरेदी केली तर तिची किंमत जास्त होते.