कृषी

अवकाळीपाठोपाठ रोगराईने पिके धोक्यात ! ढगाळ वातावरणामुळे रोगाचा प्रादुर्भाव

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : सध्या जिल्ह्यासह राज्यात पडत असलेल्या अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेले आहेत. मात्र आता सततच्या ढगाळ हवामानामुळे तुर कांदा, कपाशी पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे आधीच शेतकऱ्यांसमोर असलेल्या संकटात वाए झाली आहे.

शेवगाव तालुक्यातील ढोरजळगांव, भातकुडगांव, आपेगांव, आखतवाडे, आव्हाणे बु, मळेगांव परीसरात अवकाळी वादळी पाऊस व सततच्या ढगाळ हवामानामुळे तुर कांदा, कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी उभी पिके धोक्यात आली आहेत.

गेल्या दोन वर्षात पावसाचे जीवनमान पुर्णपणे बदलले असुन, प्रत्येक मोसमात अवकाळी व अवेळी पडणाऱ्या पावसाने पीके पुर्णपणे भुईसपाट झाली आहेत. यावर्षी बाजरी पीक हे फक्त नावालाच उरले आहे.

बाजरीची पेरणी झाली खरी परंतु सुरूवातीला पावसाने पाठ फिरविल्याने पीके पुर्णपणे करपुन गेली. कपाशीची लागवड उशीराने झाली. ऐन वेळी पावसाने पाठ फिरविली होती. तर आता आलेल्या अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या तूर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सद्यस्थितीत तुर काढणीस आली आहे. सध्या पडत असलेल्या सततच्या पावसाने व ढगाळ वातावरणामुळे कांद्याची रोपे व लागवड केलेल्या कांद्यावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.

आधीच मोठा खर्च करूनही कपाशी व कांदा पीक वाया गेले आहे. त्याता आता वेळोवेळी ढगाळ वातावरणामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने महागडी औषधे फरवारणी करून उरली सुरली पिके वाचवण्याचा शेतकरी प्रयत्न करत आहेत.

Ahmednagarlive24 Office