अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 Krushi news :- भारतात शेती व्यवसायात मोठा बदल बघायला मिळत आहे. आता शेतकरी बांधव पारंपरिक पिकांना बगल देत नगदी पिकांची लागवड करू लागले आहेत.
कृषी तज्ञ देखील शेतकऱ्यांच्या या बदलाचे समर्थन करतात. कृषी तज्ञांच्या मते शेतकरी बांधवांनी (Farmers) अल्प कालावधीत काढणीसाठी तयार होणाऱ्या पिकांची लागवड केली पाहिजे.
या शिवाय शेतकरी बांधवांनी बाजारपेठेवर लक्ष ठेवून बाजारात काय विकले जाते तेच पिकवले पाहिजे. आज आपण अशाच एका पिकाच्या लागवडीविषयी जाणून घेणार आहोत.
आज आपण काकडीच्या शेती (Cucumber farming) विषयी जाणून घेणार आहोत. काकडीला बाजारपेठेत सदैव मागणी असते विशेष म्हणजे उन्हाळ्यात काकडीला मोठी मागणी असते.
काकडीच्या शेतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे काकडी कोणत्याही प्रकारच्या जमिनीत वाढू शकते. म्हणजेच याची लागवड वालुकामय माती असलेल्या जमिनीत,चिकणमाती असलेल्या जमिनीत, काळी माती (Black Cotton soil) असलेल्या कसदार जमिनीत किंवा मग गाळाची माती असलेल्या सुपीक जमिनीत सर्व ठिकाणी याची लागवड केली जाऊ शकते.
अशा परिस्थितीत, आपण आपल्या शेतात याची लागवड करू शकता. भारतात सर्वत्र काकडीची लागवड केली जाते. काकडीला नेहमीच मागणी असते मात्र उन्हाळ्यात काकडीला विशेष मागणी बघायला मिळते म्हणुन सध्या काकडीला चांगली मागणी आहे.
काकडीशिवाय सलाद देखील अपूर्ण राहते असंच म्हणावं लागेल आरोग्यासाठीही काकडी फायदेशीर आहे. काकडीचे पीक 60 ते 80 दिवसांत तयार होते.
उन्हाळ्यात काकडीचा हंगाम मानला जातो. म्हणजेच या हंगामात काकडीला प्रचंड मागणी असते. ज्या जमिनीचा अर्थात मातीचा pH म्हणजेच सामू 5.5 ते 6.8 यादरम्यान असतो त्या ठिकाणी काकडीची लागवड केल्यास अधिक उत्पादन प्राप्त होऊ शकते.
हे पीक नद्या आणि तलावांच्या काठावर देखील घेतले जाऊ शकते. प्रसारमाध्यमानुसार, उत्तर प्रदेशचे शेतकरी दुर्गा प्रसाद यांनी देखील काकडीची लागवड केली होती.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी या अवलिया शेतकऱ्याने अवघ्या 4 महिन्यांत 8 लाख रुपये कमावले होते. या अवलिया शेतकऱ्यांनी नेदरलँड काकडीची लागवड केली होती.
या काकडीचे वैशिष्ट्य म्हणजे या जातीच्या काकडीत बिया नसतात. त्यामुळे मोठ्या रेस्टॉरंट आणि हॉटेल्समध्ये या काकडीला मोठी मागणी असते.
या शेतकऱ्याने काकडीची लागवड पॉलीहाऊस उभारून सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी शासनाकडून 18 लाख रुपयांचे अनुदान देखील या शेतकऱ्याला मिळाले.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आपल्या देशी काकडीची किंमत 20 रुपये/किलो असते तर नेदरलँड जातीची बिया नसलेली ही काकडी 40 ते 45 रुपये/किलो दराने विकली जाते.
वर्षभर सर्व प्रकारच्या काकडीला मागणी असते, कारण काकडीचा वापर सलाडच्या स्वरूपात केला जातो. यामुळे काकडी ची शेती शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर ठरू शकते.