Variety Of Garlic:- लसूण हा एक दैनंदिन वापरातील प्रमुख घटक असून प्रत्येक घरामध्ये स्वयंपाकात लसणाचा वापर केला जातो हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे बाराही महिने लसणाला मागणी चांगली असते व दर टिकून असल्याचे चित्र दिसून येते. सध्या आपल्याला माहित आहे की मागील काही महिन्यांपासून लसणाच्या दरात प्रचंड प्रमाणात तेजी असून सध्या लसणाचे दर हे तीनशे ते साडेतीनशे रुपये प्रति किलोच्या दरम्यान आहेत.
महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर साधारणपणे पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त लसूण लागवड केली जाते. लसणाची लागवड शेतकऱ्यांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत फायदेशीर असून जास्तीत जास्त शेतकरी या माध्यमातून चांगला आर्थिक नफा मिळवू शकतात.
परंतु कुठल्याही पिकाप्रमाणे जर भरघोस उत्पादन हवे असेल तर लागवडीसाठी वाणाची निवड करताना ती सुधारित आणि दर्जेदार उत्पादन देणाऱ्या वाणाची कारणे खूप गरजेचे असते. अगदी हीच बाब लसणाला देखील लागू होते.
या दृष्टिकोनातून जर आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तर्फे विकसित करण्यात आलेल्या सुधारित जाती जर पाहिल्या तर त्या लागवडीसाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत.
या विद्यापीठाने महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील लसूण लागवड करणाऱ्या भागातून स्थानिक वाणाचा संग्रह करून त्यातून निवड पद्धतीने जास्त उत्पन्न देणाऱ्या काही सुधारित जाती विकसित केलेल्या आहेत. त्याचीच माहिती या लेखात आपण थोडक्यात बघू.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या लसणाच्या जाती
1- श्वेता- लसणाची ही जात लागवडीसाठी खूप उपयुक्त असून या जातीचा लसणाचा गड्डा रंगाने पांढराशुभ्र असतो व याचा स्वाद तिखट व मोठा आकाराचा गड्डा असतो. साधारणपणे 26 पाकळ्या एका गड्ड्यात असतात. श्वेता जातीची लागवड केल्यानंतर साधारणपणे 130 ते 135 दिवसात काढणीस तयार होतो व हेक्टरी 100 ते 105 उत्पादन मिळते.
2- फुले बसवंत- ही लसणाची सुधारित जात असून निवड पद्धतीने विकसित करण्यात आलेली आहे व या वाणाच्या गड्ड्याचा रंग जांभळा असून पाकळ्या देखील जांभळ्या रंगाच्या असतात. एका गड्ड्यात 25 ते 30 पाकळ्या येतात व हेक्टरी 140 क्विंटल उत्पन्न मिळते. फुले बसवंत या वाणाची लागवड रब्बी हंगामामध्ये करता येते व त्याकरताच हा वाण शिफारस करण्यात आला आहे.
3-गोदावरी- लसणाच्या गोदावरी वाणाचा गड्डा रंगाने जांभळा पांढरा असतो व मध्यम आकाराचा गड्डा असतो. एका गड्ड्यामध्ये साधारणपणे 24 पाकळ्या येतात. गोदावरी वाणाची लागवड केल्यानंतर साधारणपणे 140 ते 145 दिवसात काढणीस तयार होतो व हेक्टरी 100 ते 105 क्विंटल उत्पादन मिळते.
4- यमुना सफेद-2- यमुना सफेद दोन हा लसणाचा वाण देखील शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचा ठरणारा असून या वाणाचे गड्डे घट्ट आकर्षक व पांढऱ्या रंगाचे असतात व एका गड्ड्यांमध्ये साधारणपणे 35 ते 40 लसणाच्या पाकळ्या असतात. यमुना सफेद दोन या जातीच्या लागवडीपासून सरासरी हेक्टरी दीडशे ते दोनशे क्विंटल उत्पादन मिळते.
5- फुले नीलिमा- लसणाचा हा सुधारित वाण लसूण लागवडीसाठी खूप फायद्याचा असून या जातीचा गड्डा आकार आणि मोठा असतो व जांभळ्या रंगाचा असून लसणावर येणाऱ्या फुल किडे तसेच कोळी या कीटकांना तर जांभळ्या करपा रोगाला मध्यम प्रतिकारक्षम असल्याने फवारणी किंवा रोग नियंत्रणावरचा खर्च कमीत कमी होतो.