Dairy Farming Tips : भारतात पशुपालन शेतीच्या अगदी सुरवातीपासून प्रचलित आहे. म्हणजे अनादी काळापासून शेतकऱ्यांनी पशुपालन हे उत्पन्नाचे दुसरे साधन बनवले आहे. पशुपालन व्यवसायामुळे शेतासाठी खताची व्यवस्था देखील सहज होते.
अर्थातच या व्यवसायातून दूध विकून आणि शेणखत विक्रीतून दुहेरी उत्पन्न मिळते. पूर्वी शेतकरी आपल्या गरजेनुसार गाई-म्हशींचे पालनपोषण करत, पण आज गाई-म्हशी पालनाकडे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते.
दरम्यान यातून चांगला लाभ मिळवण्यासाठी जाणकार लोकांनी प्रगत गाई-म्हशीच्या जाती निवडण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे आज आपण गाई-म्हशीच्या प्रगत जातींची माहिती जाणून घेणार आहोत.
गीर गाय – भारतीय जातीची ती गाय, जिची देशातच नव्हे तर परदेशातही खूप मागणी आहे. इस्रायल ते ब्राझील सारख्या देशांमध्ये गीर गाय खूप प्रसिद्ध आहे, ज्याचे मूळ गुजरातच्या गिर जंगलांशी संबंधित आहे. एका दिवसात 50 ते 80 लिटर दूध देणाऱ्या सर्वात दुभत्या गायीचा किताब तिला मिळाला आहे. गीर गाय पाळली तर दुग्धव्यवसायातून चांगली कमाई होऊ शकते. एका अंदाजानुसार, गीर गाय दरवर्षी 2,400 ते 2,600 लिटर दूध देऊ शकते. हे पूर्णपणे गाईची काळजी आणि चांगले पशुखाद्य यावर अवलंबून असते. याचे दूध अतिशय पौष्टिक मानले जाते.
मुर्राह म्हैस – जेव्हा जेव्हा दुग्धोत्पादनाचा विचार केला जातो तेव्हा गीर गायीनंतर मुर्राह म्हशीचे नाव सर्वात वर येते. हरियाणाच्या रोहतक, हिसार आणि जिंद जिल्ह्यांतील आणि पंजाबच्या नाभा आणि पटियाला जिल्ह्यांतील ही म्हैस जगभर प्रसिद्ध आहे. काळ्या रंगाच्या मुर्राह म्हशीपासून तुम्ही दररोज 10 ते 25 लिटर दूध घेऊ शकता. तज्ज्ञांच्या मते, एक चांगली मुर्राह म्हैस 4,000 लिटर दूध देऊ शकते. उत्तर भारतात दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची पहिली पसंती मुर्राह म्हैसच आहे.
साहिवाल गाय – ही देखील गायीची एक देशी जात आहे, जी आजकाल उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरियाणातील शेतकऱ्यांमध्ये अधिक लोकप्रिय झाली आहे. साहिवाल गाईची चांगली काळजी घेतल्यास एका दिवसात 15 ते 25 लिटर तर वर्षभरात 2000 ते 3000 लिटर दूध मिळू शकते. दुग्धव्यवसाय करणारे साहिवाल गाय मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन करत असल्याने या जातीच्या गायी पाळतात. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे साहिवाल गाय प्रतिवेत 10 महिने दूध देते. भारताव्यतिरिक्त ही दुभती गाय पाकिस्तानातही आढळते.
सुरती म्हैस – गुजरातमधील सुर्ती म्हैसने देशभरात ठसा उमटवला आहे. याच्या दुधात 8 ते 12 टक्के फॅट असते. सुर्ती म्हशी वर्षभरात 900 ते 1300 लिटर दूध देऊ शकते. सुर्ती म्हशींपासून चांगल्या दुधाच्या उत्पादनासाठी तिच्या खुराकावर लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
थारपारकर गाय– गुजरात आणि राजस्थानमध्ये आढळणारी थारपारकर गाय ही देखील एक देशी आणि मजबूत जात आहे. याला अल्पभूधारक शेतकऱ्यांचा आधार असेही म्हणतात, कारण थरपारकर गाय कमी प्रमाणात दररोज 10 ते 15 लिटर दूध देऊ शकते. ही गाय जैसलमेर, बिकानेर आणि जोधपूरची आहे, मात्र आता देशभरात तिची लोकप्रियता वाढत आहे. इतर गाईंप्रमाणेच तिचे दूधही पौष्टिकतेने परिपूर्ण असते. या जातीच्या गाईपासून वर्षभरात 3000 ते 4000 लिटर दुधाचे उत्पादन घेतले जाऊ शकते.
मेहसाणा म्हैस- मेहसाणा म्हैस गुजरात आणि महाराष्ट्रातील बहुतांश भागात पाळली जाते. ही म्हैस दिसायला मुर्राह म्हशीसारखीच आहे, पण आकाराने ही अधिक मजबूत आहे. मेहसाणा म्हशीपासून तुम्ही 1200 -1500 लिटर प्रति वेत दूध उत्पादन घेऊ शकता. या जातीला गीर म्हैस असेही म्हणतात.