Agricultural News : वाढत्या उष्णतेमुळे फळांच्या रसाबरोबर लिंबू पाणी, लिंबू सरबतांना मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात लिंबांचीही मागणी वाढली आहे. परिणामी, घाऊक बाजारात लिंबांच्या दरात वाढ झाली आहे.
घाऊक बाजारात ४५० ते ६५० रुपये शेकडा दराने विकले जात आहेत. हेच दर ३ महिन्यापूर्वी १५० ते २५० रुपये होते. घाऊक बाजारात लिंबाचे दर वाढल्यामुळे किरकोळ बाजारातदेखील एका लिंबासाठी ६ रुपये मोजावे लागत असून, २० रुपयांत ४ लिंबू दिले जात आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक भाजीपाला बाजारात आंध्र प्रदेश, नगरमधून मोठ्या प्रमाणात लिंबू येत असतात. नेहमी लिंबांच्या ८ ते १० गाड्यांची आवक घाऊक भाजीपाला बाजारात नियमित होते.
मात्र, या ठिकाणाहून येणाऱ्या लिंबांच्या गाड्यांची संख्याही आता कमी झाली आहे. सध्या ५ ते ६ गाड्या बाजारात येत आहेत. त्यामुळे मागणी पूर्ण करता येत नाही, अशी स्थिती आहे. मे महिना संपेपर्यंत तरी हेच चित्र बाजारात असणार आहे.