कृषी

वाळवंटी जमीन, प्रदूषित पाणी..पठ्ठयाने तरीही पिकवली स्ट्रॉबेरी व ब्रोकली ! आज कमावतोय लाखो रुपये

Published by
Ahmednagarlive24 Office

असं म्हटलं जात की दुनिया झुकती है लेकिन झुकानेवाला चाहिये. जो प्रयत्न करतो, जिद्द ठेवतो त्यासाठी काहीच अशक्य नसत. हे आठवायचं कारण म्हणजे ही म्हण अगदी तंतोतंत खरी ठरवली आहे एका शेतकऱ्याने. जे शेतकरी, युवा शेतीत दम नाही किंवा शेतीतून फायदा मिळत नाही असं म्हणतात त्यांच्यासाठी या शेतकऱ्याचे उदाहरण डोळ्यात अंजन घालणारे ठरेल.

ही कहाणी आहे राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची. या शेतकऱ्याचे नाव आहे रामचंद्र राठोड. या शेतकऱ्याने थेट राजस्थानात जेथे वातावरण कशा पद्धतीचे आहे हे आपल्याला वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही, अशा कठीण हवामानात वाळवंटी जमीनीत स्ट्रॉबेरी आणि ब्रोकोलीची यशस्वी लागवड केली आहे. यातून त्याने भरपूर उत्पन्न मिळवत स्वतःची आर्थिक प्रगती केली आहे.

 नापीक जमिनी, प्रदूषित पाण्याचा डार्क झोन तरीही पिकवले सोने
रामचंद्र राठोड जोधपूर जिल्ह्यातील लुनी या ठिकाणी राहतात. आता आधी येथील स्थिती कशी आहे ते एकदा पाहुयात. हा जो परिसर आहे तो नापीक जमिनींसाठी ओळखला जातो. येथील पाणी इतके प्रदूषित आहे की, हा परिसर डार्क झोन म्हणून वर्गीकृत केला गेलाय. भाग इतका वाळवंटी की नेहमीच दुष्काळ. अनेक तरुण नोकरीसाठी येथून स्थलांतरण करत असतात. अशा या भागात या शेतकऱयाने कमाल केली. त्यांनी अशा जमिनीत स्ट्रॉबेरी आणि ब्रोकोलीची यशस्वी लागवड केली. त्यांनी जे कृषी तंत्र वापरलय त्याने जागतिक कृषी तज्ज्ञांचेही लक्ष वेधून घेतलंय. त्यांनी या जमिनीत यशस्वी उत्पन्न घेत आर्थिक स्तर उंचावला आहे.

 परिस्थितीने शिक्षण सोडावं लागलं, तेथूनच फिरलं नशीब
रामचंद्र यांच बालपण हळदीत गेलं. त्यांचेच वडीलही शेतकरी.लहरी हवामान त्यांचे पिके उध्वस्त होत. यातूनच त्यांची आर्थिक एथिती खालावत राहिली. त्यामुळे रामचंद्र यांना पुढील शिक्षण घेता आलं नाही. त्यांना शिक्षण सोडावं लागलं. व त्यांना शेतीत मदत करावी लागली. त्यांनी वयाच्या 17 व्या वर्षी वडिलांच्या निधनानंतर स्वतः शेती करण्यास सुरवात केली. सुरुवातीला त्यांनी मूग, बाजरी आणि ज्वारीची पिके घेतली परंतु त्यात त्यांना यश आलं नाही. परंतु नंतर त्यांनी सरकारच्या कृषक मित्र योजनेंतर्गत सात दिवसांच प्रशिक्षण घेतलं. येथूनच त्यांच्या विकासाला सुरवात झाली. त्यांनी नाविन्यपूर्ण कृषी पद्धतींचा अवलंब सुरु केला. कृषी शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनातून आणि प्रशिक्षणातून मिळालेल्या व्यावहारिक ज्ञानातून त्यांनी पावसाचे पाणी साठवण्याची क्षमता आणि अनियमित हवामानाच्या नमुन्यांविरुद्ध पॉलिहाऊसचे संरक्षणात्मक फायदे शोधून काढले. यातूनच त्यांनी आपली एक पद्धत विकसित केली. ब्रोकोली व स्ट्रॉबेरीचे त्यांनी यशस्वी उत्पादन घेतले.

 ‘अशा’ पद्धतीचे वापरले टेक्निक
रामचंद्र यांनी डेअरिंग करत 2018 मध्ये पॉलीहाऊस उभारले. 2019 मध्ये शेततळे आणि गांडूळ-कंपोस्ट युनिट उभारून नवीन पाऊल टाकले. पावसाच्या पाण्याचा योग्य वापर करत पॉलीहाऊसमध्ये काकडीची लागवड केयी. विशेष म्हणजे यात त्यांनी 100 चौरस मीटरमध्ये 14 टन इतके विक्रमी उत्पादन मिळवले. येथून त्यांच्या यशास सुरवात झाली. त्यानंतर त्यांनी नगदी पिके घेण्याचे ठरवले. त्यांनी स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड केली. आज त्यांच्याकडून अनेक शेतकरी प्राशिक्षण घेत आपले आयुष्य उंचावत आहेत.

 रामचंद यांचा मोलाचा सल्ला
रामचंद्र यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. ते म्हणतात की, नोकरीच्या मागे धावून, स्थलांतर करून प्रश्न मिटणार नाही. विकास होणार नाही. व्यवस्थित प्रशिक्षण घेऊन शेतकऱ्यांनी पावसाचे पाणी वाचवायला शिकले तर आपले राज्य नक्कीच समृद्ध होऊ शकेल. त्यामुळे नोकरीच्या मागे न धावता शेतीतून शाश्वत उत्पन्न कमवले पाहिजे.

Ahmednagarlive24 Office