कृषी

Dragon Fruit Farming: वकील असलेल्या तरुण शेतकऱ्याने दीड एकर ड्रॅगन फ्रुट शेतीतून मिळवले साडेचार लाखांचे उत्पन्न! असे केले नियोजन

Published by
Ajay Patil

Dragon Fruit Farming:- आधुनिक तंत्रज्ञान आणि वेगळ्या पिकांची लागवड यामुळे आता कृषी क्षेत्राचा चेहरा मोहराच पार बदलून गेला असून यामुळे कृषी क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर विकसित होताना दिसून येत आहे. परंपरागत पिकांऐवजी आता मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवडीकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कल दिसून येतो.फळबाग लागवडीमध्ये शेतकऱ्यांनी खूप मोठी मजल मारली असून सफरचंदासारखी पिक देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवले आहे.

त्यासोबतच ड्रॅगन फ्रुट, सफरचंद तसेच पेरू,द्राक्ष अशा अनेक प्रकारचे फळांची लागवड महाराष्ट्र मध्ये करण्यात आलेली आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे फळबागांमधून भरघोस उत्पादन घेत शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करून बाजारपेठ देखील काबीज करण्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू ठेवले आहेत.तसेच जे काही सुशिक्षित तरुण आता शेतीकडे येत आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागांची लागवडीतून आर्थिक उन्नती साधताना दिसून येत आहेत.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण ड्रॅगन फ्रुट या फळाचा विचार केला तर गेल्या काही वर्षापासून भारतात आणि महाराष्ट्रात ड्रॅगन फ्रुट लागवडीखालील क्षेत्रात टप्प्याटप्प्याने वाढ होत आहे. ड्रॅगन फ्रुट शेतीतून शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळवत आहेत. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील व्यवसायाने वकील असलेले शरद नाईकनवरे या युवा शेतकऱ्याचा विचार केला तर त्यांनी ड्रॅगन फ्रुट लागवडीतून खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक यश मिळवले आहे.

 दीड एकर ड्रॅगन फ्रुट शेतीतून मिळवले साडेचार लाखांचे उत्पन्न

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, माजलगाव तालुका हा कमी पावसाचा पट्टा म्हणून परिचित आहे. या ठिकाणी असलेल्या कमी पाऊस किंवा कधीकधी पडणारा जास्तीचा पाऊस तसेच वातावरणातील बदल इत्यादीचा विपरीत परिणाम शेती व्यवसायावर होताना दिसून येत आहे. परंतु या सगळ्या गोष्टींवर मात करत या ठिकाणाच्या शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुट लागवडीच्या माध्यमातून फायदेशीर शेती ही संकल्पना पुढे आणली आहे.

याच माजलगाव येथील युवा शेतकरी एडवोकेट शरद नाईकनवरे यांनी दीड एकर ड्रॅगन फ्रुट शेतीतून साडेचार लाखांचे उत्पन्न मिळवत चांगल्या प्रकारे आर्थिक समृद्धी मिळवली आहे. सध्या या पट्ट्यामध्ये पाण्याची मुबलक सुविधा तसेच ऊस व कापूस आणि सोयाबीन इत्यादी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. परंतु कधीकधी कमी पावसामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो.

या अनुषंगाने या ठिकाणचे उच्चशिक्षित शेतकरी आता फळबाग लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर भर देत आहेत. या माध्यमातून या ठिकाणाच्या तरुण शेतकऱ्यांनी डाळिंब, मोसंबी, चिकू तसेच पपई व केळी, केशर आंबा, टरबूज इत्यादी पिकांची यशस्वी लागवड करत आर्थिक उत्पन्न मिळवले आहे व या फळबागांसोबत आता ड्रॅगन फ्रुट शेती देखील या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी यशस्वी केली आहे. याच ठिकाणी वकील असलेले शरद नाईकनवरे यांनी चार जातीच्या ड्रॅगन फ्रुटची फेब्रुवारी 2022 मध्ये 12 बाय सात अंतरावर ड्रॅगन फ्रुटची लागवड केली होती व वेळोवेळी योग्य व्यवस्थापन तसेच मशागत व फवारणीचे नियोजन केले.

सध्या त्यांना ड्रॅगन फ्रुट उत्पादन मिळू लागले असून दीड एकरात त्यांनी आतापर्यंत साडेचार लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. ड्रॅगन फ्रुट शेतीला चांगले दिवस येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे भारतामध्ये असलेल्या मागणीच्या तुलनेत 20 टक्के उत्पादन होते. ८० टक्के ड्रॅगन फ्रुटची आयात करावी लागते व त्यामुळे या ड्रॅगन फ्रुट शेतीत खूप मोठी संधी आहे. तसेच एक कमीत कमीत पाण्यात येणारे पीक असून  मार्च ते या तीन महिन्याच्या कालावधीत अवघे सहा वेळेस जरी तुम्ही पाणी दिले तरी ड्रॅगन फ्रुट चे उत्पादन चांगले येते असे देखील शरद नाईक नवरे यांनी म्हटले आहे.

ड्रॅगन फ्रुट विषयी जर आपण साधारणपणे माहिती घेतली तर वर्षातील आठ हंगाम येतात व याला प्रामुख्याने महाराष्ट्रातील बाजारपेठ ही सोलापूर, छत्रपती संभाजी नगर तसेच नांदेड, पुणे, मुंबई, अहमदनगर असून राज्याबाहेर हैदराबाद हे एक मोठी बाजारपेठ आहे. ठिबकद्वारे पाण्याचे नियोजन करणे खूप गरजेचे असते व एकूण विक्री खर्च दीड लाख पर्यंत येतो व एकरी उत्पन्न सहा लाख रुपये पर्यंत मिळते.

एका एकर करिता ५१८ पोलची आवश्यकता असते व या पोलच्या साह्याने तुम्ही दोन हजार शंभर रुपयांची लागवड करू शकतात. दीड वर्षांमध्ये या झाडाला फळ लागायला लागतात व या झाडाचे आयुष्य साधारणपणे 20 ते 25 वर्ष आहे. ड्रॅगन फ्रुट ची रेड व्हाईट ही जात शुगर असलेल्या व्यक्तींना देखील खायला फायद्याचे आहे तर जम्बो रेड व सी जाती सर्वांसाठी उपयुक्त आहेत.

Ajay Patil