कृषी

अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल ! भाव वाढत नसतील, तर आमचा फायदा काय?

Published by
Ahmednagarlive24 Office

Agricultural News : अल-निनो, निसर्गाचा लहरीपणा, पर्जन्यमान अल्प होऊन सर्वच पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. त्यामुळे जेमतेम निघालेले उत्पन्न आजही बहुतेक शेतकऱ्यांच्या घरातच आहे. उत्पादन घटूनही भाव वाढत नसतील,

तर आमचा फायदा काय? असा सवाल संतप्त शेतकरी करत आहेत.पिकविलेल्या शेती मालाचे संकटाचे दाटलेले ढग हटणार कधी? अशी आर्त हाक शासनाला करत आहे.

पावसाचा लहरीपणा, किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, रासायनिक खतांचे वाढलेले भाव, वाढलेली मजुरी यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. उलट उत्पादन घटले. खरिपातील पिकासाठी जीवाचे रान करून पेरणी केलेले पीक पावसाने गुंगारा दिल्याने हाती लागले नाही.

त्यात आता कापूस व सोयाबीनचे बाजारभाव पुरेसे वाढत नाही. त्यामुळे घरांच्या कोपऱ्यात पडून असलेला कापूस व सोयाबीन कधीपर्यंत सांभाळून ठेवायचे, रोजचा खर्च मात्र टळत नसल्याने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत.

त्यात प्रत्येक पक्ष व पुढारी उठतो व शेतकरी वर्गाच्या आम्ही पाठीशी असल्याचे छातीठोकपणे सांगतो. मग शेती मालाची बाजारपेठ ढासळल्यावर तुम्ही जाता कुठे? अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या उमटत आहे.

सरकार शेतकऱ्यांचे की व्यापाऱ्यांचे?

शेतकरी जेव्हा मार्केटमध्ये शेतीमाल आणतो, तेव्हा कवडीमोल दर मिळतो. शेतकऱ्यांचा शेतीमाल संपल्यावर मात्र तोच माल व्यापाऱ्यांकडे गेल्यावर भाव वधारतो कसा? मग फक्त शेतकऱ्यांचे सरकार नावालाच का? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

अवकाळीच्या नावाखाली लूटमार नको

नुकताच नगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने बहुतेक शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीचा सामना करावा लागला. त्यात कापूस काही ठिकाणी भिजला आहे. त्यामुळे अवकाळीने कापसाला पाणी लागले म्हणत शेतकऱ्यांच्या अहेवलेना नको व आर्थिक लूटमार नको अशी अपेक्षा शेतकरी करत आहे.

Ahmednagarlive24 Office