Ahmednagar News : आजही अनेक भागात समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे या भागात शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असुन पेरणा खोळंबल्या आहेत.
पावसाअभावी सध्या शेतकरी हतबल झाला आहे. बदलत्या हवामानाचा शेतीव्यवसायाला सवसंधिक फटका बसत आहे. ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी भाजीपाल्याची लागवड केल्याने त्यांना या संकटात काही प्रमाणात दिलासा मिळाला.
मात्र आता त्यांच्याकडील देखील भाजीपाला संपला आहे. बहुतेक शेतकऱ्यांकडील भाजीपाल्यासह इतर शेतमाल संपला आहे. पर्यायाने आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे दर वाढलेले आहेत. मान्सूनच्या पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्यांसह भाजीपाल्याची लागवड करणे देखील शक्य झालेले नाही.
पर्यायाने जो पूर्वी लागवड केलेला भाजीपाला होता तो आता संपला आहे. त्यामुळे भाज्यांची आवक घअली आहे. आठवडे बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. परिणामी भाजीपाल्यांच्या दरात तेजी आली आहे.
सध्या किरकोळ बाजारात भेंडी ६०, गवार १००, शिमला मिरची ६० ते ८०, वांगी ४०, टोमॅटो १३० ते १४०, हिरवी मिरची १२०, कारले ६० ते ८०, दोडके ६० रूपये किलो दराने विकले जात आहे. तर मेथी ४० रूपये जुडी, कोथिंबीर ४० रूपये जुडी या दराने विकल जात आहे. भाजीपाल्यासह दैनंदिन वापरात असलेले आर्द्रक देखील महागले आहे.
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले दर : टोमॅटो १५०० – ७५००, वांगी ५००-२५००, फ्लावर १००० – ५०००, कोबी ५००-२०००, काकडी १००० – २५००, गवार ४००० – ७०००, घोसाळे १००० – २५००, दोडका १००० ४५००, कारले ३००० – ५०००, कैरी २००० – २५००, भेंडी १००० – ४५००, वाल ३०००-६०००, घेवडा १०,००० – १०,०००, बटाटे ७०० १७००, लसूण १६०००- १६०००, हिरवी मिरची ४००० ७०००, शेवगा २००० ५०००, भू. शेंग ३५०० – ४५००, लिंबू ७०० – १५००, आद्रक ९००० १४,२००, गाजर २०००- २५००, दु. भोपळा ५०० – १८००, शिमला मिरची १००० ४५००, मेथी १६००-४०००, कोथिंबीर १६०० – ४०००, चवळी ३००० – ५५००.