Agricultural News : उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक कमी झाली असून, कांदा, शेवगा, घेवडा, मटारच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. उन्हाळ्यामुळे पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.
कोथिंबिर, मेथी, कांदापात, चुकाच्या दरात वाढ झाली. तर अन्य पालेभाज्यांच्या दरातही काहीशी वाढ झाली आहे.
येथील बाजार समितीच्या लिलावात काल रविवारी (दि.५) कोथिंबीर, मेथीच्या जुड्याची आवक झाली होती. किरकोळ बाजारात एक जुडी मेथी, कोथिंबिरीचे दर २० ते ३० रुपयांपर्यंत आहेत.
तर घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे कोथिंबीर १२०० ते २००० रुपये, मेथी १२०० ते १५०० रुपये, शेपू ८०० ते १२०० रुपये,
चुका ५०० ते १००० रुपये, चवळई ४०० ते ७०० रुपये, पालक ८०० ते १५०० रुपये, कांदापात ८०० ते १५०० रुपये, करडई ३०० ते ७०० रुपये, पुदिना ३०० ते ६०० रुपये, अंबाडी ४०० ते ७०० रुपये, मुळा ८०० ते १२०० रुपये, असा भाव मिळाला.