कृषी

शेतकऱ्यांची ई-पीक तलाठी दप्तरी नोंद करावी

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : शेतकऱ्यांनी कष्टाने केलेली ई – पीक पाहणी तलाठी यांच्या दप्तरी दिसत नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी. अशी मागणी भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केली आहे.

१५ ऑगस्ट २०२१ पासून महाराष्ट्रामधे ई – पीक पाहणीची सुरुवात करण्यात आली. यावर्षी असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये काढलेला पीक विमा मिळू शकतो अशी अपेक्षा आहे.

मात्र पीक विमा मिळण्यासाठी ई – पीक पाहणी करण्याची अट आहे. यासोबतच ई-पीक पाहणी करण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. ई – पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना अनेक द्राविडी प्राणायाम करावे लागतात.

त्यातही अनेकदा सर्वर डाऊन असते. काही जागेवर काही शेतामध्ये अद्याप रेंज मिळत नाही. अशा अनेक उपदव्यापातून ई – पीक पाहणी केली तरी सुमारे ५० % ई- पीक पाहणी तलाठी दप्तराला दिसत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

तलाठी महोदयही याला दुजोरा देतात त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेली ई – पीक पाहणी तलाठी दप्तराला १००% नोंदविली जाईल यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.

अशी मागणी अशोक सब्बन, गणेश इंगळे, वीरबहादुर प्रजापती, कैलास खांदवे, सुनील टाक, विलास खांदवे, भगवान जगताप व जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी लेखी स्वरूपात केली आहे.

Ahmednagarlive24 Office