कृषी

केळी उत्पादकांना पीक विमा भरण्यासाठी ३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

Published by
Ahmednagarlive24 Office

Agricultural News : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत फळ पीक विमा योजनेत केळी पिकाचा विमा भरण्यासाठी राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना ३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत हवामान आधारित फळ पीक विमा योजनेमध्ये केळी या पिकाचा विमा भरण्यास ३१ ऑक्टोबर २०२३ ही अंतिम मुदत देण्यात आली होती. ३१ ऑक्टोबरपर्यंत सुमारे ४५ हजार ७३१ अर्जदारांनी केळी पिकासाठी विमा योजनेत सहभाग घेतला होता.

तांत्रिक अडचणींमुळे काही केळी उत्पादक शेतकरी या योजनेत ठरावीक वेळेत सहभागी होऊ शकले नव्हते. त्यामुळे मुंडे यांनी केंद्राकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती.

अखेर धनंजय मुंडे यांची ही विनंती केंद्राकडून मान्य करण्यात आली असून, केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी आता ३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office