काही व्यक्ती स्वतःच्या लौकिक कामगिरीमुळे एखाद्या क्षेत्रामध्ये खूप मोठे नाव कमावतात. यामध्ये त्यांचे कष्ट आणि धडाडी तसेच जिद्द कारणीभूत असते. अशा अलौकिक कामगिरीमुळे अशा व्यक्तींचा योग्य तो सन्मान देखील करण्यात येतो. असेच अनेक सन्माननीय आणि अलौकिक काम करणारे शेतकरी हे शेती क्षेत्रामध्ये असून त्यांचे खूप मोठे काम या क्षेत्रात आहे.
तसेच असे व्यक्ती हे स्वतःसोबत इतरांना देखील मोठ्या प्रमाणावर त्यांच्यासोबत पुढे नेतात. अशीच महत्वाची कामगिरी उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ या शहरापासून जवळ असलेल्या बाराबंकी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने केली आहे.या शेतकऱ्याची यशकथा आपण पाहणार आहोत.
300 एकर सामूहिक शेतीतून हा शेतकरी कमवतो दोन कोटी
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊला अगदी जवळ असलेल्या बाराबंकी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने तीन एकर पासून शेती करायला सुरुवात केली आणि आज हा शेतकरी 300 एकर क्षेत्रावर सामूहिक शेती करत आहे. या शेतकऱ्याचे नाव आहे राम शरण वर्मा हे होय. या सामूहिक शेतीच्या माध्यमातून रामशरण वर्मा वर्षाला तब्बल दोन कोटी रुपये कमाई करतात. या त्यांच्या अलौकिक कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले आहे.
यांची एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे प्रगतिशील शेतकरी आहेत परंतु त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर ते हायस्कूलमध्ये नापास झालेले आहेत. परंतु उत्तम शेतीच्या जोरावर त्यांनी आधुनिक जीवनातील सर्व सुख सोयी मिळवले आहेत. महत्वाचे म्हणजे त्यांनी संवाद साधताना सांगितले की, दररोज ते 100 ते 150 लोकांना त्यांच्या शेतीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देत आहेत. एका कामगाराला दिवसाला चारशे रुपये मजुरी दिली जाते. या सामूहिक शेतीमध्ये ते प्रामुख्याने भाजीपाला पिकांची लागवड करतात. विशेष म्हणजे ते संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने करतात.
या पद्धतीची शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचा रासायनिक खतांचा वापर ते करत नाहीत. तसेच पीकचक्र मध्ये त्यांनी संतुलन ठेवले असून यामध्ये कमीत कमी खर्चात ते जास्तीत जास्त नफा मिळवतात. त्यांच्याकडे वडिलोपार्जित सहा एकर जमीन होती. त्यांचे वडील ही शेती करायचे. परंतु राम शरण वर्मा यांनी 1986 पासून सहा एकर जमिनीचा प्रवास 300 एकर सामूहिक शेतीपर्यंत केला आहे. बाराबंकी जिल्ह्याच्या दौलतपुर या गावांमध्ये गरीब शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. परंतु आज ते संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एक अभिमान ठरले आहेत.
तसेच रामशरण वर्मा हे टिशू कल्चर पद्धतीने केळीची लागवड करतात.एका एकर मध्ये लागवड केलेल्या केळी पिकातून ते तब्बल अडीच ते साडेतीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न घेतात व भाजीपाल्यामध्ये टोमॅटो आणि बटाट्याची शेती करतात. आजूबाजूच्या परिसरातील आणि जिल्ह्यातील शेतकरी त्यांच्या फार्म हाऊसला भेट देतात व या ठिकाणी येऊन विविध प्रकारची शेतीतील महत्त्वाची तंत्र देखील शिकतात. त्यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले असून त्यांच्या या सामूहिक शेतीच्या प्रयत्नातून पंधरा ते वीस हजार लोकांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे.