Farmer Success Story : शेतकऱ्याचा नादच खुळा! कोथिंबीर शेतीतून झाला करोडपती, खरेदी केली एसयूव्ही कार आणि घर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story : शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून देशभरातील अनेक राज्यांमध्ये शेतकरी असतात. कांदा उत्पादक शेतकरी गेल्या काही दिवसांपासून अडचणीत आहेत. मात्र महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याने कोथिंबीर शेतीतून करोडो रुपये कमावले आहेत.

महाराष्ट्रातील लातूरमधील एका शेतकऱ्याने कोथींबीर शेती करून करोडो रुपयांचा बक्कळ नफा कमावला आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे नशीबच पालटले आहे. शेतमालाला भाव आणि योग्य वेळी योग्य पीक केल्यानंतरच शेतीतून नक्कीच नफा मिळू शकतो हे या शेतकऱ्याच्या शेतीतून समजून येईल.

लातूरमधील रमेश विठ्ठलराव यांनी ५ वर्षांमध्ये कोथिंबीर शेतीमधून बक्कळ नफा कमावला आणि आज ते कोट्याधीश झाले आहेत. रमेश विठ्ठलराव हे शेतकरी २०१९ पासून कोथिंबीर शेती करत आहेत. त्यांना कोथिंबीर शेतीमधून आजपर्यंत सर्वाधिक नफा १ कोटी रुपयांपेक्षा जास्त मिळाला आहे.

रमेश विठ्ठलराव यांनी सलग पाच वर्षे कोथिंबीर शेती करून त्यामधून तब्बल 1 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे एका आयटी इंजिनिअरला देखील लाजवेल अशी कमाई रमेश विठ्ठलराव या शेतकऱ्याने केली आहे.

रमेश विठ्ठलराव या शेतकऱ्याने कोथिंबीर शेतीमधून कमावलेल्या नफ्यातून एक एसयूव्ही आणि घरही खरेदी केले असल्याचे त्यांनी सांगितले. कोथींबीर पिकाची लागवड करण्यापूर्वी शेतकरी द्राक्ष पिकाची लागवड त्या शेतीमध्ये करत होते.

रमेश विठ्ठलराव या शेतकऱ्याने सांगितले की ते आगोदर द्राक्ष पिकाची लागवड केली होती. २०१५ मध्ये त्यांनी ३ एकर शेतीमध्ये द्राक्ष पिकाची लागवड करून ५ लाख रुपये मिळाले होते. या ३ एकर द्राक्ष बागेतून त्यांना एकूण ५० टन द्राक्ष उत्पादन मिळाले आणि ही द्राक्ष १० रुपये किलोने त्यांनी विकली.

पण शेतकऱ्याने सांगितले की त्यांना ३ एकर द्राक्ष बागेसाठी साडेसहा लाख रुपयांचा खर्च आला होता. त्यांना या द्राक्ष शेतीतून नफा न मिळाल्याने त्यांनी द्राक्ष पिकाची लागवड बंद केली आणि कोथिंबीर शेती करण्याचा निर्णय घेतला.

2019 पासून सुरू केली कोथिंबीर शेती

रमेश विठ्ठलराव यांनी २०१९ पासून कोथिंबीर शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा या निर्णयाने त्यांना कोट्याधीश बनवले आहे. त्यांनी २०१९ साली १ लाख रुपयांची गुंतवणूक कोथिंबीर शेतीमध्ये केली होती. त्यांना पहिल्याच वर्षी २५ लाख रुपये नफा झाला होता.

त्यानंतर २०२० मध्ये त्यांना 16 लाख, २०२१ मध्ये 14 लाख रुपयांचा नफा मिळाला आणि 2022 मध्ये 13 आणि यावर्षी २०२३ मध्ये त्यांनी 16.30 लाखांची कमाई केली आहे. त्यामुळे कोथिंबीर शेतीमधून या शेतकऱ्याचे नशीबच पालटले आहे.

कोथिंबीर शेतीतून खरेदी केलेली SUV

रमेश विठ्ठलराव यांनी कोथिंबीर शेतीमधून बक्कळ नफा कमावल्यानंतर गावामध्ये एक आलिशान घर बांधले आहे. तसेच त्यांनी एक एसयूव्ही कार देखील खरेदी केली आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत या शेतकऱ्याने कोथिंबीर शेती केल्याने त्यांना बक्कळ नफा मिळाला आहे.

रमेश विठ्ठलराव या शेतकऱ्याने धर्मपरिक शेती सोडून शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच पारंपरिक शेतीला खर्च अधिक होतो आणि नफा कमी मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा शेतीच्या जाळ्यामध्ये अडकू नये असे देखील त्यांनी सांगितले आहे.