अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2022 Hydroponic farming : काय आहेत हाइड्रोपोनिक शेती? हाइड्रोपोनिक शेती म्हणजे हाइड्रोकल्चर पद्धतीने शेतीमध्ये मातीचा वापर न करता आधुनिक पद्धतीने शेती करणे.
तेलंगनातील शेतकरी हरिचंद्र रेड्डी आज या शेतीतून करोडो रुपये कमवत आहेत. या शेतीतून सुरुवातीलाच भरघोस उत्पादन मिळेलच असे नाही.
रेड्डी यांनी सुरुवातीला हायड्रोपोनिक शेतीचे प्रशिक्षण घेतले व नंतर त्यावर गहन अध्ययन व या शेती मागील अडचणी समजून घेऊन टप्प्याटप्प्याने ही शेती करण्यास सुरुवात केली.
सुरूवातील हायड्रोपोनिक शेती करण्यासाठी खर्च हा मोठ्या प्रमाणात येतो.पण नैसर्गिक पद्धतीने ही शेती केल्यास कमी खर्चात अधिक उत्पादन घेता येऊ शकते.हरिचंद्र रेड्डी हे या प्रकारची शेती करून 3 करोड ची कमाई करत आहेत.
हाइड्रोपोनिक शेती करण्याची कल्पना कशी आली हरिशचंद्र रेड्डींना सेंद्रिय शेतीतून पिकवलेला भाजीपाला लोकांना विकण्याची ईच्छा होती. पण बाजारातील भाज्यांची वाढलेली मागणी लक्षात घेता. त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन भाजीपाला शेती विषयी माहिती घेऊन हाइड्रोपोनिक शेती करण्याचे ठरवले.
सुरूवातीला खर्च झाला पण नंतर खर्च कमी होत जाऊन नफ्यात वाढ होत गेली.आज हरिशचंद्र रेड्डी वर्षाकाठी 3 करोडचे हाइड्रोपोनिक शेतातून उत्पादन घेत आहेत. आज त्यांची आजूबाजूच्या परिसरात हायड्रोपोनिक शेतीत प्रगत शेतकरी म्हणून ओळख बनली आहे.
पॉलीहाऊस उभारणी हरिशचंद रेड्डी यांनी नैसर्गिक वातावरणापासून भाजीपाला शेती सुरक्षित ठेवण्यासाठी पॉलीहाऊसची निर्माण केले. आणि नंतर त्यात हायड्रोपोनिक पद्धतीने भाजीपाल्याची शेतीची लागवड केली. सुरुवातीला पॉलीहाऊस उभारण्यासाठी खर्च आला पण नंतर शेतातील खर्च कमी होत जाऊन नफ्यात वाढ होत गेली.
काय आहे हायड्रोपोनिक शेती हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती करण्यासाठी मातीची आवश्यकता लागत नाही. या पद्धतीमध्ये शेतीत विना मातीचा वापर करून आधुनिक पद्धतीने शेती केली जात आहे. हाइड्रोपोनिक शेतीत फक्त पाणी किंवा वाळूचे खडे यावर शेती केली जाते.
या शेतीसाठी 15 ते 30 डिग्री तापमानाची आवश्यकता असते. ती 80 ते 85 टक्के आर्द्रता असलेली हवामानात भाजीपाल्याची शेती करता येते. या शेतीत आपण शिमला मिर्ची, वाटाना, गाजर, काकडी, मूळा, बटाटा, स्ट्रॉबेरी आणि भाजीपाल्यांच्या वनस्पतींची लागवड करू शकतो.
हायड्रोपोनिक शेती मध्ये किती खर्च येतो या पद्धतीचा वापर करण्यासाठी आधी अधिक किंमत लागते, पण एकदा ही प्रणाली पूर्णरूपाने स्थापित केली गेली की तेव्हा तुम्ही या प्रणालीचा अधिक लाभ मिळवू शकता. कमी जागेत अधिक भाजीपाला लागवड करता येऊ शकतो.
तर हायड्रोपोनिक पद्धतीने शेती करण्यास एक एकरास जवळपास 50 लाख रुपये खर्च येतो जर तुमंचे छोटे क्षेत्र असेल जवळ जवळ 100 वर्गफूट क्षेत्रात मध्ये हे तंत्र स्थापित केले गेल्यास 50,000 ते 60,000 रूपये इतका खर्च येतो. या क्षेत्रात तुम्ही 200 भाजीपाल्यांच्या रोपांची लागवड करू शकता. तर तुम्ही तुमच्या घरा मध्ये देखील या तंत्राचा वापर करून हायड्रोपोनिक शेती करू शकता.
हायड्रोपोनिक शेतीचे होणारे लाभ हायड्रोपोनिक शेतीतून शेतकऱ्याला भरघोस नफा मिळू शकतो. सुरुवातीला खर्च हा अधिक जरी येत असला तरी मात्र ही यंत्रणा स्थापित झाल्यास खर्चात कमतरता होऊन नफ्यात वाढ होत जाते. हायड्रोपोनिक शेतीतून अनेक प्रकारचे लाभ मिळत असतात.
पाणी बचत हायड्रोपोनिक शेतात जवळपास ९० टक्के पाण्याची बचत होते. वर्तमानकाळात शेतीची आवश्यकता अधिक आहे. आज जल संकटाची समस्या वाढत चालली आहे. त्यामुळे हायड्रोपोनिक शेतीचा भविष्यात चांगला उपयोग होऊ शकतो.
हायड्रोपोनिक शेतीतून मिळणारा नफा हायड्रोपोनिक शेतीत रायनिक खताचा आणि रासायनिक कीटनाशकांचा वापर केला जात नाही. त्यामुळे हायड्रोपोनिक शेतीत घेतलेल्या पिकांचा आरोग्यास कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. म्हणून या शेतीतून लोकांच्या आरोग्यासाठी गुणवत्तापूर्वक फायदेशीर उत्पादन घेतले जाते.