Agricultural News : शेतकऱ्यांची आपली संस्था टिकली पाहिजे, त्यासाठी सभासदांनी कर्ज भरणा वेळेवर करून संस्था उर्जित अवस्थेत आणली पाहिजे, असे प्रतिपादन मंजाबापू थोरात यांनी येथील सेवा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण प्रसंगी केले.
याप्रसंगी टाकळीभान सेवा संस्थेचे प्रशासकीय अधिकारी ए.आर. रुद्राक्षे अध्यक्षस्थानी उपस्थित होते यावेळी थोरात म्हणाले की, आपण काळजीपूर्वक आपले व्यवहार जर संस्थेत अचूक ठेवले, तर अल्प वेळेमध्ये व अल्प व्याज दरामध्ये शेतकऱ्यांना अर्थ पुरवठा करणारी दुसरी संस्था नाही.
इतर बाहेरील बँकांचे व खाजगी बँकांचे कर्ज शेतकऱ्यांना परवडत नाही. सभासदांनी चांगले व्यवहार ठेवले, तर थकबाकीत न जाता शेतकऱ्यांचे सभासदत्व अबाधित राहून संस्थेचे ही हित जोपासले जाईल.
तसेच गेल्या दोन-तीन वर्षापासून शेतकरी अडचणीत असून संपूर्ण कर्जमाफी शासनाने करावी. तसेच शेतकऱ्यांनी वेळोवेळी संस्थेच्या आलेल्या ओटीएस कर्ज योजनेचा फायदा घेऊन थकबाकीदार होण्यापासून वाचण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेही यावेळी थोरात म्हणाले.
याप्रसंगी राहुल पटारे म्हणाले की, मी स्वतः व माझे बंधू पंकज आप्पासाहेब पटारे कोणत्याही शासनाच्या कर्जमाफीच्या योजनेत बसलो नसून याची आम्हाला चौकशी करून सांगावी, अशी मागणी केली. यावेळी सभेचे अध्यक्ष प्रशासकीय अधिकारी रुद्राक्षे यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन शासनाच्या अधीन राहून त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येतील, असे सांगितले
याप्रसंगी ज्ञानदेव साळुंके, कारेगाव भागचे संचालक शिवाजीराव शिंदे, दादासाहेब कोकणे, मधुकर कोकणे, दत्तात्रय नाईक, राजेंद्र कोकणे, उपसरपंच कान्हा खंडागळे, बाजार समितीचे संचालक मयूर पटारे, यशवंत रणनवरे, दत्तात्रय मगर, विलास दाभाडे, सोमनाथ पाबळे, प्रा. जयकर मगर, भैय्या पठाण,
भाऊसाहेब पटारे, सुनील बोडखे, रेवननाथ कोकणे, पाराजी पटारे, दिगंबर मगर, लक्ष्मण सटाले, मोहन रणनवरे, भाऊसाहेब कोकणे, संजय पटारे, जितेंद्र पटारे, पाराजी कोकणे, शिवाजी पवार, अनिल कोकणे, तुकाराम बोडखे, आप्पासाहेब रणनवरे आदीसह सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.
मागील दोन-तीन वर्षापासून सततचा दुष्काळ, अतिवृष्टी अशा अनेक संकटांना शेतकरी सामोरा जात असून, अतिवृष्टीची व पिक विम्याची कोणतीही नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मिळाली नाही. यासाठी शासना मार्फत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, असा ठराव टाकळीभान सोसायटी तर्फे करावा, अशी सूचना तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे मांडली.