Wheat Farming : गहू हे उत्तर, पूर्व आणि मध्य भारतातील रब्बी हंगामातील सर्वात प्रमुख पिकांपैकी एक आहे. याची लागवड राज्यातही मोठ्या प्रमाणात केली जाते. कृषी तज्ञानी सांगितल्याप्रमाणे, गव्हाच्या पेरणीसाठी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंतचा सर्वोत्तम काळ मानला जातो.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात जवळपास ९५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. परंतु काही शेतकऱ्यांनी अजून पेरणी केलेली नाही. खरीप पिकाची काढणी उशिरा झाल्याने किंवा पावसाच्या चढ-उतारामुळे गव्हाची पेरणीही उशिराने होत असते.
जर तुम्हाला अजून गव्हाची पेरणी करता आली नसेल, तर आम्ही तुम्हाला गव्हाच्या काही उशीरा तयार होणाऱ्या वाणांबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यांची पेरणी ही 25 डिसेंबरपर्यंत आणि त्यापुढील काळात सुद्धा करता येऊ शकते.
उशिरा पेरता येणाऱ्या गव्हाच्या सुधारित जाती ?
पंजाब, हरियाणा, राजस्थानचा काही भाग तसेच पश्चिम उत्तर प्रदेशात PBW 752, PBW 771, DBW 173, JKW 261, HD 3059, WH 1021 या जातींची शिफारस करण्यात आली आहे.
यांची पेरणी 25 डिसेंबरपर्यंत करता येते.पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि झारखंड यांसारख्या क्षेत्रांच्या हवामानात DBW 316, PBW 833, DBW 107, HD 3118 JKW 261, PBW 752 या जातींची पेरणी करता येऊ शकते. 25 डिसेंबरपर्यंत या जातींची पेरणी करता येऊ शकते.
याशिवाय HD 3407, HI 1634, CG 1029, MP 3336 या गव्हाच्या जाती आहेत ज्या की, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये उशिरा पेरणीसाठी शिफारशीत आहेत.जर समजा काही कारणांमुळे 25 डिसेंबरपर्यंत गव्हाची पेरणी करता आली नाही, तर निराश होण्याचे काहीही कारण नाही.
कारण की, गव्हाच्या अशा अनेक सुधारित जाती आहेत ज्यांची पेरणी 25 डिसेंबरनंतरही करता येते. महत्वाचे म्हणजे उशिरा पेरणी होऊनही या जाती चांगले उत्पादन देतात.
HD 3271, HI1621 आणि WR 544 या गव्हाच्या अशा जाती आहेत ज्यांची पेरणी डिसेंबर अखेरपर्यंत करता येणे शक्य आहे. विशेष बाब म्हणजे या सर्व जाती उशिरा पेरणीसाठी कोणत्याही विशिष्ट राज्यात किंवा प्रदेशात नसून सर्व बागायती भागात सर्वोत्तम आहेत.