Farming News : शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी करणे गरजेचे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farming News : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंदणी करणे गरजेचे असून यासाठी सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२३ साठी ई-पीक पाहणी नोंदणी मोबाईल अॅपच्या सहाय्याने करावी असे आवाहन महसूल प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वतः च्या मोबाईलवरून आपल्या सातबाऱ्यावर विविध पिकांची नांदणी करणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून राज्यात राबविण्यात येत आहे.

खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी नोंदणीसाठी ई – पीक पाहणीचे अपडेटेड व्हर्जन -२ गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. १ जुलै २०२३ पासून पीक पाहणी करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. अतिवृष्टी व नैसर्गीक आपत्ती व इतर कारणामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे हा उद्देश आहे.

त्यासाठी शेतकरी बांधवांनी ई – पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंदणी करून घ्यावी. विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई-पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक यात तफावत आढळल्यास ई-पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे गरजेचे असून, वारंवार आवाहन करूनही शेतकरी ई-पीक पाहणी नोंदणी करत नाहीत. मोबाईलद्वारे ई-पीक पाहणी करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर ही असून त्यापूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सध्याच्या अनियमित मौसमी वातावरणामुळे पिकांची अवस्था वाईट आहे. येत्या काळात या वातावरणात बदल झाला नाही तर सरकारकडून पिकांची नुकसान भरपाई किंवा अनुदान देण्याची घोषणा झाल्यास ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी अॅपद्वारे पीक पेऱ्याची नोंद केली आहे,

अशा शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. याकामी अडचणी आल्यास गावातील तलाठी, कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.