Farming Business Idea: सुरु करा ‘हा’ शेतीपूरक व्यवसाय आणि बना लखपती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Money News : मित्रांनो भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे देशातील बहुतांशी नागरिकांचा प्राथमिक व्यवसाय शेती (Farming) असून शेतकरी बांधव शेती समवेतच मोठ्या प्रमाणात शेती पूरक व्यवसाय करत असतात.

अलीकडे देशात मत्स्य व्यवसाय वेगाने वाढत आहे. आपले देशातील शेतकरी आता शेतीसोबतच हा व्यवसाय स्वीकारून आपले उत्पन्न वाढवत आहेत. हे लक्षात घेऊन शेतीसोबतच या क्षेत्रातही नवनवीन प्रयोग केले जात असून मत्स्यपालन क्षेत्रात (Fishery Business) नवनवीन तंत्रज्ञान आणले जात आहे, याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

मत्स्यपालनाची अशीच एक पद्धत सध्या लोकप्रिय होत आहे. यामध्ये टॅंक बनवून मत्स्यपालन केले जाते. या टेक्निक मुळे शेतकऱ्यांना कमी जागेत अधिक उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातं आहे.

विशेष म्हणजे मत्स्यशेतीला चालना देण्यासाठी सरकारही खूप मदत करते. एवढेच नाही तर सरकारने मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा दिला आहे. याशिवाय मत्स्यशेतकऱ्यांनाही सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

आज अनेक शेतकरी मत्स्यशेतीचा अवलंब करून आपले उत्पन्न वाढवत आहेत. देशात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांना पारंपारिक शेतीसोबतच मत्स्यशेतीचा फायदा होत आहे. असाच एक शेतकरी आहे परवेझ खान हा मूळचा उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील आहे.

टॅंक मध्ये सुरु केले मत्स्यपालन
परवेज खान यांनी सुरुवातीला शेत तलावात मत्स्यपालन करायला सुरवात केली होती. नंतर त्यांनी अधिक उत्पन्न कमवण्यासाठी आधुनिक पद्धतीने मत्स्यशेतीची टॅंक पद्धत स्वीकारली. टॅंक प्रणालीला कमी जागा लागतं असल्याने कमी जागेत अधिक उत्पन्न मिळते.

या टॅंक पद्धतीने आउटपुट जास्त मिळतं असल्याचे परवेज स्पष्ट करतात. परवेज खान यांनी 21 हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेल्या फिश फार्ममध्ये 25*25 फूट लांबीचे 38 टँक बनवले आहेत.

त्यात चार फूट पाणी असते. या टाक्यांमध्ये पाण्याचा प्रवाह कायम राहावा यासाठी त्यांनी सर्कुलर अॅक्वाकल्चर बसवले आहे. मत्स्य पालन व्यवसायातून परवेज लाखो रुपयांची कमाई करत आहे तसेच आपल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना देखील याबाबत अवगत करत आहेत.

निश्चितच मत्स्य पालन व्यवसाय इतर शेतीपूरक व्यवसायाप्रमाणे शेतकऱ्यांना विशेष फायदेशीर ठरणार आहे. अनेक शेतकरी बांधव मत्स्यपालन व्यवसायातून चांगली मोठी कमाई करत आहेत.

परवेज खान देखील अशाच शेतकऱ्यांपैकी एक आहेत. यामुळे काळाच्या ओघात मत्स्य पालन व्यवसाय आधुनिक पद्धतीने करून निश्चितच शेतकरी बांधव अधिक उत्पन्न मिळवू शकतात.