Farming Business Idea : या फुलाची शेती सुरु करा आणि अल्प कालावधीतच बना श्रीमंत; वाचा याविषयी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Farming Business Idea : देशात शेती व्यवसायात (Agricultural Sector) काळाच्या ओघात अनेक वेगवेगळे बदल बघायला मिळत आहेत. यामध्ये प्रमुख बदल आहे पीक पद्धतीत होणारा बदल.

अलीकडे देशातील शेतकरी बांधव पारंपरिक पिकांना फाटा देत नगदी पिकांची (Cash Crop) शेती तसेच फळबाग लागवड (Orchard Planting) व फुलशेती मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत.

यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असून त्यांना आर्थिक सुबत्ता देखील प्राप्त होत आहे. मित्रांनो शेती व्यवसायातील हाच बदल ओळखून आज आम्ही आपल्या वाचक मित्रांसाठी जरबेरा फुल शेती (Gerbera flower farming) विषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत.

मित्रांनो खरे पाहता संपूर्ण भारतातील हवामान फुलशेतीसाठी (Floriculture) योग्य असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार लोक सांगत असतात. आपल्या राज्याचे हवामान देखील फुलशेतीसाठी (Flower Farming) विशेष अनुकूल आहे.

यामुळे शेतकरी फुलशेतीतून चांगले पैसे कमवू शकतात, अनेक शेतकरी बांधव फुल शेती मधून मोठा पैसा उभा करीत आहेत. मित्रांनो सध्या इतर फुलशेतीच्या तुलनेत जरबेरा फुल शेती (Gerbera Cultivation) मोठ्या प्रमाणात केली जात आहे कारण की, या फुलांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

बारामाही मागणी असल्यामुळे या फुलाच्या शेती मधून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. हे फूल दिसायलाही अतिशय सुंदर आणि आकर्षक असते, यामुळे ते चांगल्या किमतीत विकले जाते.

फुलांची वाढती मागणी पाहता राज्यातील शेतकऱ्यांचा जरबेरा शेतीकडे कल वाढला आहे. सजावटीशिवाय या फुलांचा वापर आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठीही मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे आपल्या राज्यात जरबेरा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

जरबेरा शेतीसाठी आवश्यक हवामान 

मित्रांनो कृषी तज्ञांच्या मते, जरबेरा लागवडीसाठी समशीतोष्ण हवामान आवश्यक असते अशा हवामानात या फुलाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना निश्चितच अधिक उत्पादन मिळू शकणार आहे.

याशिवाय जरबेरा लागवडीसाठी हिवाळ्यात सूर्यप्रकाश आणि उन्हाळ्यात हलकी सावली लागते. यामुळे या फुलाची शेती प्रामुख्याने शेडनेटमध्ये केली जाते.

या फुलशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला नफा कमवायचा असेल तर शेडनेटमध्ये अर्थात पॉलिहाऊसमध्ये या पिकाची लागवड करण्याचा सल्ला कृषी तज्ञ देत असतात.

या फुलाच्या लागवडीसाठी आवश्यक कमाल तापमान 20-25 अंश सेंटीग्रेड असावे जेणेकरून जरबेरा फुलांची रोपे चांगले विकसित होतील.

या तापमानात फुले योग्य प्रकारे विकसित होतात, म्हणून शेतकऱ्यांनी या फुलाची लागवड पॉलीहाऊसमध्ये करावी जेणेकरून पॉलीहाउस मध्ये तापमान नियंत्रित केले जाऊ शकते.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की आपल्या राज्याव्यतिरिक्त झारखंड, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये जरबेरा फुलाचे यशस्वी उत्पादन घेतले जात आहे.

या फुलशेतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. मात्र कृषी तज्ञ जरबेरा फुलांची लागवड वालुकामय जमीन असलेल्या शेतजमिनीत करण्याचा सल्ला देतात.

जरबेरा फुलांची रोपे चिकणमाती असलेल्या जमिनीत देखील चांगले वाढतात. या फुलाच्या लागवडीसाठी, मातीचे pH मूल्य 5.0 ते 7.2 दरम्यान असावे, असा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देत असतात.

जरबेरा शेतीसाठी आवश्यक पूर्वमशागत
जरबेरा फुलशेतीसाठी या पद्धतीने तयार करा जमीन मित्रांनो जरबेराच्या फुलांच्या एकूण 70 पेक्षा जास्त जाती आहेत. असे असले तरी जरबेराच्या ठराविक जातीचीच लागवड व्यावसायिक शेतीसाठी केली जाते.

जरबेराच्या डस्टी, फ्लेमिंगो, फ्रेडी, फ्रेडकिंग, फ्लोरिडा इत्यादी अनेक जाती आहेत, ज्यांची लागवड केली जाते. जरबेराची लागवड करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी शेतातील तण आणि शेतात उरलेल्या जुन्या पिकाचे अवशेष पूर्णपणे नष्ट केले पाहिजे यामुळे जरबेरा फुलांच्या रोपांच्या वाढीसाठी पोषक वातावरण मिळत असते.

यानंतर शेताची चांगली नांगरणी करून घ्यावी. नांगरणीनंतर शेत काही दिवस तसेच राहू द्यावे. यानंतर जुने कुजलेले शेणखत टाकावे. दोन ते तीन वेळा तिरप्या पद्धतीने नांगरणी करावी. यानंतर शेतात पाणी घालावे. मग तीन ते चार दिवसानंतर खत टाकल्यानंतर पुन्हा नांगरणी करावी, जेणेकरून शेतीची माती चांगली भुसभुशीत होईल.

जरबेरा शेतीचे आर्थिक गणित
जरबेरा फुलाला तीन महिन्यांनी फुले येतात. फ्लॉवरिंग सुरु झाल्यानंतर शेतकरी एका महिन्यात 10 वेळा फुले तोडू शकतात.

मित्रांनो जर 30X30 मीटरचे शेडनेट उभारून शेतकऱ्यांनी जरबेरा फुल शेती केली तर त्यांना 3200-3300 जरबेराची रोपांची लागवड करता येणे शक्य होणार आहे.

इतकी झाडे लावल्यानंतर शेतकरी प्रत्येक तोडणीच्या वेळी 800 फुले तोडू शकतात. खुल्या बाजारात एका फुलाची किंमत 50 ते 60 रुपये आहे. एका दिवसात 700 फुले आली तर शेतकरी 3500 रुपयांची फुले एका दिवसात विकतील.

याप्रमाणे महिन्यातील 10 दिवसांची कमाई 35000 रुपये असेल. त्याच्या लागवडीसाठी 5000 रुपये खर्च येतो. अशा प्रकारे निव्वळ नफा 30000 हजार रुपये शेतकऱ्याला राहू शकतो. 30X30 मीटर आकाराच्या शेडनेटमध्ये शेतकरी बांधव सहा महिने शेती करून पावणे दोन लाखांची कमाई सहज करू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe