Farming Business Idea : मित्रांनो नापिक जमिनीत कोणतेच पीक घेतले जात नाही. अशा परिस्थितीत नापीक जमीन अशीच रिकामी, खाली राहते. परंतु जर शेतकरी बांधवांनी (Farmer) अशा नापिक जमिनीत मेहंदी ची शेती केली तर त्यांच्यासाठी फायद्याची राहणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार मेहंदीची शेती (Henna Farming) नापीक जमिनीत देखील करता येणे शक्य आहे. विशेष म्हणजे मेहंदीची (Henna Crop) एकदा लागवड केल्यानंतर अनेक वर्षे उत्पादन घेता येणे शक्य आहे. जाणकार लोकांच्या मते, एकदा मेहंदी (Henna Crop Farming) लागवड केल्यानंतर सुमारे शंभर वर्षे या पिकातून उत्पादन मिळत राहते.
अशा परिस्थितीत नापीक जमीन असलेल्या शेतकरी बांधवांना मेहंदी लागवड फायदेशीर ठरणार आहे. विशेष म्हणजे मेहंदीच्या पिकाला जास्त पाण्याची आवश्यकता भासत नाही कमी पाणी असलेल्या भागात देखील मेहंदी ची शेती (Farming) केली जाऊ शकते. राजस्थान मधील शेतकरी बांधव देखील नापीक असलेल्या कमी पाण्याच्या भागात मेहंदीची लागवड करून चांगली कमाई (Farmer Income) करत आहेत. अशा परिस्थितीत आज आपण मेहंदीच्या शेतीमधील काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत.
मेहंदीचा वापर
मेहंदीची पाने, साल, फळे आणि बिया अनेक औषधांमध्ये वापरतात. हे कफ व पित्तशामक आहे. त्याची फळे झोप, ताप, जुलाब आणि रक्तप्रवाहाशी संबंधित औषधे बनवण्यासाठी वापरली जातात, तर पाने आणि फुलांपासून तयार केलेली पेस्ट कुष्ठरोगात वापरली जाते. मेंदीच्या पानांचा रस डोकेदुखी आणि कावीळसाठी उपचार करण्यासाठी देखील वापरला जातो.
मेंदी शेतीसाठी जास्त पाणी लागत नाही
ICAR-KAZRI (सेंट्रल एरिड झोन रिसर्च इन्स्टिटय़ूट) शी संलग्न कृषी विज्ञान केंद्र, पाली येथील तज्ज्ञांच्या मते, मेंदी पेरतानाच माती चांगली ओललेली असावी. यानंतर मेंदीच्या लागवडीत सिंचन करू नये. यामुळे पानांचे रंगद्रव्य कमी होते. तथापि, तीव्र दुष्काळाच्या परिस्थितीत मेंदीच्या लागवडीस पाणी द्यावे लागेल. थेट पेरणी आणि नर्सरीमध्ये कलमने तयार रोपांची पुनर्लावणी म्हणूनही मेहंदीची लागवड करता येते. सावलीच्या रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करण्यासाठी मार्च-एप्रिलमध्ये बियाणं पेरणी करून रोपे विकसित करावीत आणि त्यानंतर पावसाळा सुरू झाल्यानंतर जुलैमध्ये शेतात लागवड करावी.
मेहंदीसाठी शेतीची तयारी
मेंदीच्या शेतात पावसाळ्याच्या पहिल्या पावसाने 2-3 वेळा उभी आडवी नांगरणी करावी. जेणेकरून जमिनीतील हानिकारक जंतू नष्ट होतात. अधिक उत्पादन मिळविण्यासाठी, प्रति हेक्टरी 8-10 टन कुजलेले खत किंवा कंपोस्ट खत घालणे देखील खूप फायदेशीर ठरेल. वाळवी नियंत्रणासाठी 10 टक्के मिथाइल पॅराथिऑन पावडरही मातीत मिसळावी.
मेहंदी बीज प्रक्रिया आणि बियाणे दर
थेट शेतात बियाणं फोकून मेंदीची पेरणी करण्यासाठी, प्रति हेक्टर 20 किलो बियाणे पुरेसे आहे. रोपवाटिकेत पेरणीपूर्वी मेंदीच्या बिया 10-15 दिवस सतत पाण्यात भिजत ठेवल्या जातात. त्याचे पाणी रोज बदलून हलक्या सावलीत वाळवावे. फेब्रुवारी-मार्चमध्ये मेहंदीची पेरणी केली जाते. रोपे लावण्यासाठी योग्य वेळ जुलै-ऑगस्ट आहे.
तणनियंत्रण आणि खत व्यवस्थापन
प्रक्रिया केलेले बियाणे वाफ्यात किंवा शेतात समान प्रमाणात वाळू मिसळून पेरले जाते. यानंतर, हलके झाडून, बियांवर बारीक कुजलेले शेण शिंपडा आणि झाकून टाका. पेरणीनंतर दोन ते तीन आठवड्यांनी बिया अंकुरतात. रोपवाटिकेतील रोपे 40-50 सें.मी.च्या उंचीवर आल्यावर शेतात 50 सेमी अंतरावर सरळ रेषेत लागवड करावी. लावणीनंतर एक महिन्याने तण काढण्याचे काम करावे. मेंदीच्या योग्य वाढीसाठी रोपांच्या ओळींच्या दोन्ही बाजूंना नत्र 40 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात दरवर्षी पहिल्या खुरणीच्या वेळी द्यावे. चांगला पाऊस झाल्यास त्याच प्रमाणात नत्र दुसऱ्या खुरपणीच्या वेळी द्यावे.
स्वच्छ हवामानात मेहंदीची काढणी करावी
मेंदी काढणीच्या वेळी हवामान स्वच्छ असावे. पहिली कापणी मार्च-एप्रिलमध्ये आणि दुसरी कापणी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जमिनीपासून 2-3 इंच उंचीवर करावी. पाने पिवळी पडण्याआधी त्याच्या फांद्यांचा खालचा भाग कापून टाकावा, कारण मेंदीच्या पानांचे अर्धे उत्पादन झाडाच्या खालच्या भागातून मिळते. कापणी केलेली पाने तीन ते चार दिवस वाळवावीत. या दरम्यान, उत्पादनावर पाणी पडू नये, कारण रिमझिम स्वरूपाचा पाऊस देखील मेहंदीची गुणवत्ता खराब करू शकतो. सुकी पाने गोणीत ठेवून कोरड्या जागी ठेवावीत.
मेंदी लागवडीतून उत्पन्न आणि कमाई
मेहंदीच्या पावसावर अवलंबून असलेल्या पिकातून सरासरी 1200 ते 1600 किलो कोरडी पाने प्रति हेक्टरी मिळतात. मात्र, पहिल्या तीन वर्षांत हेक्टरी 500 ते 700 किलोपर्यंत उत्पादन मिळू शकते. मेहंदीची लागवड 20 ते 30 वर्षे अतिशय सुपीक आणि फायदेशीर राहते. मात्र, एकदा पेरणी केली की शंभर वर्षे मेंदीचे उत्पादन मिळू शकते, असेही म्हटले जाते. त्याच्या लागवडीसाठी पहिल्या वर्षी सुमारे 20 हजार रुपये खर्च येतो. मात्र दुसऱ्या वर्षापासून ते निम्मेच राहते. मेहंदीची सुकी पाने 25 ते 30 रुपये किलोने बाजारात विकली जातात.