कृषी

Farming Idea : पिटाया फळाची शेती ठरू शकते शेतकऱ्यांसाठी वरदान; वाचा याविषयी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Krushi news :- शेतकरी बांधव आता काळाच्या ओघात पारंपारिक पीक पद्धतीला रामराम ठोकत आहेत.

पारंपरिक पिकांना (Traditional Crops) अधिक उत्पादन खर्च करावा लागत असल्याने शेतकरी बांधव (Farmer) आता नगदी पिकांच्या (Cash Crop) लागवडीकडे तसेच बाजारात ज्या पिकांची जास्त डिमांड असते त्या पिकांची लागवड करण्याकडे भर देत असल्याचे बघायला मिळत आहे.

नगदी तसेच फळबाग पिकांची लागवड शेतकऱ्यांसाठी विशेष फायदेशीर देखील ठरत आहे. आज आपण अशाच एका फळबाग पिकाविषयी जाणून घेणार आहोत.

शेतकरी मित्रांनो आज आपण ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruit Farming) या फळाच्या लागवडीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ड्रॅगन फ्रुट या फळाला देशात तसेच विदेशात मोठी मागणी असते यामुळे या फळाची शेती शेतकऱ्यांसाठी विशेष फायदेशीर ठरू शकते.

कृषी तज्ञ देखील शेतकरी बांधवांना शेतीमध्ये बदल करण्याचा सल्ला देत असतात. खरं पाहता ड्रॅगन फ्रुट हे अमेरिकन वंशाचे आहे.

हे फळ जरी अमेरिकन असलं तरी देखील भारतीय शेतकर्‍यांसाठी हे वरदान ठरत आहे. भारतातील अनेक शेतकरी बांधव सध्या ड्रॅगन फ्रुटची शेती करत आहेत आणि विशेष म्हणजे ड्रॅगन फ्रुटची लागवड या शेतकऱ्यांसाठी चांगला बक्कळ नफा देखील कमवून देत आहे.

ड्रॅगन फ्रुटला भारतात पिटाया या नावाने ओळखले जाते. मित्रांनो भारतात ड्रॅगन फ्रुटची शेती हळूहळू विस्तारू लागली आहे मात्र याची सर्वात जास्त शेती वियतनाम, इजराईल, थायलंड आणि श्रीलंका या देशात जास्त असल्याचे समजते.

भारतात ड्रॅगन फ्रुटची शेती गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यात केली जाते. मित्रांनो महाराष्ट्रात कमी पावसाच्या भागात जसे की, सोलापूर, पुणे (शिरूर), सांगली येथेसुद्धा व्यापारी दृष्टिकोनातून या फळाची लागवड केली जाते.

बाजारपेठेत या फळाला बारामाही मागणी असते शिवाय या फळाला अडीचशे ते तीनशे रुपये प्रति किलो असा दर मिळतो यामुळे निश्चितच ड्रॅगन फ्रुट ची शेती शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर ठरू शकते.

शेतकरी मित्रांनो जर आपणास ड्रॅगन फ्रुटची शेती करायची असेल तर याची लागवड सुपीक जमीनीत करावी शिवाय जमीन ही पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी.

कारण की पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत याची लागवड केल्यास या पिकाला अनेक रोग अटॅक करतात. ड्रॅगन फ्रुटची लागवड अशा जमिनीत करावी ज्या जमिनीचा ph हा 6 आणि 7 या दरम्यान असतो.

ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी उष्णकटिबंधीय वातावरण मानवत असल्याचे सांगितले जाते. पारंपारिक पीकपद्धतीत अनेकदा शेतकरी बांधवांना मोठा तोटा सहन करावा लागतो यामुळे जर शेतीत काळाच्या ओघात बदल केला तर निश्चितच शेतकऱ्यांना फायदा मिळेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office