यंदा गावरान आंबा कमीच ! कैरीचाही तुटवडा जाणवण्याची शक्यता

Agricultural News

Agricultural News : बदलत्या हवामानामुळे यंदा गावरान आंबा खूप कमी प्रमाणात आलेला आहे. कमी प्रमाणात पडलेली थंडी, अवेळी पडणारा पाऊस, वातावरणात सातत्याने होणारे बदल,

ढगाळ वातावरण त्यातच किडींचा प्रादुर्भावामुळे गावरान आंब्याचे उत्पादन कमी असल्याचे दिसत असल्याचे आंबा उत्पादक शेतकरी सांगतात.

तसेच मोहरावर तुडतुड्या, तसेच भुरी रोगाचा झालेला प्रादुर्भावामुळे मोहर गळून पडला. बऱ्याच आंब्यांना अगदी कमी मोहोर आला. काही आंब्याना मोहोर आला. परंतु तो ढगाळ वातावरणामुळे गळून पडला आहे.

त्यामुळे गावरान आंब्याचे उत्पादन म्हणावे तसे आलेले दिसत नाही. दरवर्षी अक्षय्य तृतीयेला गावरान आंब्याची चव चाखायला मिळते. लोणच्यासाठीच्या कैरीचाही तुटवडा जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कालव्याच्या परिसरात गावरान आंब्याची खूप जुनी झाडे पाहावयास मिळतात. तर विविध प्रकारच्या आंब्याची लागवड करण्यात येते. त्यांना चवीनुसार नावे देण्यात आली आहेत. गावरान आंब्यांना खोबऱ्या, केळी, कागदी, शेपू, गोटी, शेंद्री साखरी आंबा आदी नावाने ओळखले जाते.

इतर जातीच्या आंब्या पेक्षा गावरान जातीच्या आंब्याला मागणी जास्त असते. साधारणपणे अक्षय्य तृतीयेपासूनच बाजारात गावरान आंबे विक्रीसाठी येतात. उत्पादन घटणार असल्याचे यंदा आंबा उत्पादक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे गावरान आंब्याची गोडी चाखायला मिळेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe