कृषी

Goat Breeding: ‘या’ शेळीच्या जातीला म्हणतात ‘शेळ्यांची राणी’! पाळाल शुद्ध भारतीय जातीची ही शेळी तर कमवाल लाखोत, वाचा या शेळीच्या जातीची संपूर्ण माहिती

Published by
Ajay Patil

शेतीशी निगडित असलेल्या कमी खर्चिक जोडधंद्यांच्या दृष्टिकोनातून शेळीपालन व्यवसाय हा एक महत्त्वाचा व्यवसाय असून कमीत कमी खर्चात व कमीत कमी जागेत तुम्ही शेळीपालन व्यवसाय सुरू करू शकतात. परंतु या माध्यमातून मिळणारा जो काही आर्थिक नफा आहे तो मात्र खूप चांगल्या प्रकारे मिळत असतो व त्यातून आर्थिक समृद्धी साधने फार कठीण नाही.

परंतु शेळीपालन व्यवसाय यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापन खूप गरजेचे असते. परंतु त्यासोबतच महत्त्वाचे असते ते शेळीपालनामध्ये कोणत्या जातीच्या शेळ्या तुम्ही पाळणार आहात याला. कारण भारतामध्ये शेळ्यांच्या भरपूर जाती आहेत व यामध्ये काही विदेशी जाती देखील आहेत.

यामध्ये भारतीय शेळ्यांच्या जाती जर पाहिल्या तर यामध्ये देखील अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि जातिवंत शेळ्या आपल्याला दिसून येतात व त्यामधील एक महत्वाचे नाव आहे ते म्हणजे जमनापारी ही शेळी होय.

ही शेळी वैशिष्ट्यपूर्ण असून शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यामध्ये पूर्णतः सक्षम आहे. विशेष म्हणजे ही शेळी शुद्ध भारतीय जातीची शेळी म्हणून देखील ओळखली जाते व तिला शेळ्यांची राणी देखील म्हणतात.

 जमनापारी शेळीचे कराल पालन तर कमवाल लाखोत

भारतातील अनेक प्रकारच्या शेळीच्या जाती पाहिल्या तर यामध्ये जमनापारी शेळी ही खूप फायदेशीर अशी शेळीची जात असून या शेळीच्या पालनातून शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते. या शेळीचे वैशिष्ट्य म्हणजे ही शुद्ध भारतीय जातीची शेळी असून तिला शेळ्यांची राणी असे देखील म्हणतात.

तुम्हाला जर ही जात ओळखायची असेल तर ती तिच्या मोठ्या आकारावरनं स्पष्टपणे आपल्याला ओळखता येऊ शकते व तिचे लांब कान असतात व ते लटकल्यासारखे राहतात. जमनापारी शेळीचे दूध देण्याची क्षमता देखील चांगली असून ती एका दिवसाला साडेतीन लिटरपर्यंत दूध देते व या शेळीचे दूध देखील चविष्ट असते.

दूध उत्पादनात व्यतिरिक्त माणूस उत्पादनासाठी देखील जमनापारी शेळीचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होतो. या शेळीचा मोठा आकार असल्यामुळे जास्त प्रमाणात मांस उत्पादन मिळण्यास देखील मदत होते. जमनापारी शेळीच्या मांसाला बाजारात देखील मोठी मागणी असते.

 जमनापारी शेळीचे वजन असते जास्त

वजनाच्या दृष्टिकोनातून जमनापारी शेळी या इतर सामान्य शेळ्यांपेक्षा जास्त वजनाच्या असतात तसेच त्यांच्या चेहऱ्यावर एक विशिष्ट प्रकारचा फुगवटा दिसून येतो. त्यामुळे या शेळीला रोमन नोज म्हणून देखील ओळखले जाते. जमनापारी जातीची शेळी संपूर्ण आयुष्य कालावधीमध्ये 12 ते 14 पिल्लांना जन्म घालते

व याशिवाय या शेळीची किंमत पंधरा ते वीस हजार रुपये पर्यंत असते. हिचा रंग पांढरा असतो तसेच पाठीवरचे केस लांब असतात व शिंगे लहान असतात. या वैशिष्ट्यांमुळे या शेळीचे पालन करणे आर्थिक दृष्टिकोनातून फायद्याचे ठरते व शेतकरी दूधच नाही तिचे मांस विकून देखील चांगला पैसा मिळवू शकता.

 

Ajay Patil

Published by
Ajay Patil