कृषी

Goat Rearing: शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! शेळीपालन करण्यासाठी मिळणार 4 लाखांचं कर्ज, अनुदान पण मिळणार, वाचा सविस्तर

Published by
Ajay Patil

Goat Rearing: ग्रामीण भागात गेल्या अनेक शतकांपासून शेळीपालन व्यवसाय (Goat Farming Business) केला जात आहे. शेळी पालन व्यवसाय शेती (Agriculture) समवेतच करता येत असल्याने अनेक अल्पभूधारक शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात शेळी पालन व्यवसाय करत असतात.

शेतकऱ्यांसमवेतचं अनेक भूमिहीन शेतीमजूर बांधव देखील मोठ्या प्रमाणात शेळीपालन करतात. शेळीपालन व्यवसायात शेतकरी बांधवांना खूपच कमी खर्च करावा लागतो शिवाय यातून जास्त नफा मिळत असल्याने शेळीपालन व्यवसाय आता मोठ्या स्तरावर देखील शेतकरी बांधव करत आहेत.

या व्यवसायाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे शेळीच्या खाण्यापिण्याची विशेष व्यवस्था करावी लागत नाही. शेळी बेरी, झुडपे आणि इतर लहान गवत खाऊन पोट भरते. मात्र असे असले तरी शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी सुरुवातीला काही रक्कम शेतकरी बांधवांना गुंतवावी लागणार आहे.

अशा परिस्थितीत अनेक अल्पभूधारक शेतकरी बांधवांकडे शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी अपेक्षित अशी रक्कम उपलब्ध नसते. यामुळे शेळीपालन व्यवसाय करण्याची इच्छा असताना देखील असे शेतकरी बांधव शेळीपालन व्यवसाय करू शकत नाहीत. मात्र असे असेल तर चिंता करण्याचे काही कारण नाही.

कारण की, जर तुम्हाला शेळीपालन करायचे असेल आणि त्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही बँकेकडून कर्ज (Goat Farming Loan) घेऊनही हा व्यवसाय करू शकता. शेळीपालनासाठी तुम्ही बँकेकडून 4 लाख रुपयांपर्यंत कर्ज (Agriculture Bank Loan) घेऊ शकता. हे कर्ज 10 शेळ्या पालनावर उपलब्ध आहे.

शेळीपालन व्यवसायासाठी कोणत्या बँका कर्ज देतात बरं…!

अनेक बँका शेळीपालन व्यवसायासाठी कर्ज देतात. हे कर्ज मेंढी/शेळीपालन योजनेंतर्गत दिले जाते. यासाठी कर्ज देणाऱ्या देशातील प्रमुख बँका पुढीलप्रमाणे आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया

IDBI बँक

कॅनरा बँक

नाबार्ड कर्ज

शेळीपालनासाठी नाबार्ड अंतर्गत किती अनुदान उपलब्ध आहे बरं…!

शेळीपालनासाठी नाबार्ड अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जातो. शेळीपालनासाठी कर्ज देण्यात नाबार्ड आघाडीवर आहे. या अंतर्गत एससी/एसटी आणि बीपीएल प्रवर्गातील लोकांना 33 टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळू शकते, तर इतर ओबीसींना 25 टक्के सबसिडी दिली जाते. अनुदानाची कमाल रक्कम अडीच लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

नाबार्ड योजनेअंतर्गत कोणत्या बँका कर्ज देतात बरं…!

अनेक बँका नाबार्ड योजनेंतर्गत येतात ज्या शेळीपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज देतात. या बँकांकडून कर्ज घेऊन तुम्ही शेळीपालन अनुदानाचा सहज लाभ घेऊ शकता. या बँका अशा आहेत.

व्यावसायिक बँक

प्रादेशिक ग्रामीण बँक

राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक

राज्य सहकारी बँक

नागरी बँक

इतर जे नाबार्डकडून पुनर्वित्तासाठी पात्र आहेत.

शेळीपालनासाठी बँकेच्या कर्जावर किती व्याज आकारले जाते बरं…!

ज्यांना शेळीपालनासाठी बँकेकडून कर्ज घ्यायचे आहे, त्यांना सांगू इच्छितो की, शेळीपालन योजनेंतर्गत शेळीपालनासाठी दरवर्षी 11.20 टक्के दराने कर्ज दिले जाते. ही कर्जाची रक्कम तुम्ही तुमच्या जवळच्या फायनान्स कंपनी, सरकारी बँक, खाजगी बँक, स्मॉल फायनान्स बँक मधून देखील मिळवू शकता.

शेळीपालन योजनेतील अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती बरं…!

शेळीपालन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेली कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.

अर्जदाराचे आधार कार्ड

अर्जदाराचे पॅनकार्ड

अर्जदाराचे रहिवासी प्रमाणपत्र

अर्जदाराचे जात प्रमाणपत्र

जमीन मालकीचे प्रमाणपत्र

बँक तपशीलांसाठी बँक पासबुकची प्रत

अर्जदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र

अर्जदाराचे पॅनकार्ड

अर्जदाराचा मोबाईल नंबर आधारशी जोडलेला आहे

अर्जदाराचा फोटो

शेळीपालन कर्जासाठी अर्ज कसा करावा बरं…!

शेळीपालनावर कर्ज घेण्यासाठी तुम्ही नाबार्डच्या अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही सहकारी बँकेत अर्ज करून शेळीपालनावरील अनुदानाचा लाभ घेऊ शकता. याशिवाय वर नमूद केलेल्या बँकांना भेट देऊन शेळीपालन योजनेंतर्गत कर्जही मिळवू शकता. यासाठी तुम्हाला अशा प्रकारे अर्ज करावा लागेल.

सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेला भेट देऊन शेळीपालन कर्जासाठी अर्ज करावा लागेल.

यासाठी तुम्हाला बँकेकडून एक फॉर्म दिला जाईल. फॉर्म घेतल्यानंतर, तुम्हाला त्यात विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी लागेल आणि फॉर्मसोबत त्यामध्ये विचारलेल्या कागदपत्रांची छायाप्रतही जोडावी लागेल.

फॉर्ममध्ये भरलेल्या माहितीची बँक अधिकारी पडताळणी करतील.

सर्वकाही व्यवस्थित राहिल्यास, पडताळणीनंतर कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल.

शेळीपालनावर कर्ज घेताना काही अडचण येत असेल तर बँक अधिकाऱ्याशी संपर्क साधून अडचण सोडवू शकता.

Ajay Patil

Published by
Ajay Patil