कृषी

गोंदियाच्या पट्ठ्याने कमालच केली! कलिंगड आणि काटेकोहरी लागवड करून कमविले 12 लाख

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2022 Krushi news :- विदर्भातील गोंदिया जिल्हा विशेषता धान उत्पादनासाठी संपूर्ण देशात नावाजलेला आहे. जिल्ह्यातील (Gondiya Farmer) शेतकरी अजूनही मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन (Grain production) घेत आहेत.

मात्र आता, जिल्ह्यातील शेतकरी बांधव पारंपरिक धान पिकाव्यतिरिक्त आता अल्पकालावधीत काढण्यासाठी येणाऱ्या नगदी व हंगामी पिकासमवेत भाजीपालावर्गीय पिकांची लागवड करीत आहेत.

विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी केलेला हा बदल त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत आहे. पीकपद्धतीत बदल केला तर निश्चितच शेतीमधून चांगले लाखो रुपयांचे उत्पन्न कमविले जाऊ शकते हेच दाखवून दिले आहे जिल्ह्यातील मोरगाव तालुक्यातील धाबेटेकडी गावातील नंदू सोनवणे या अवलिया शेतकऱ्याने.

या अवलियाने कलिंगडा (Watermelon Farming) सोबतच काटेकोहरी पिकाची लागवड करून लाखो रुपयांचा नफा कमविला आहे. विशेष म्हणजे नंदू यांनी गावातील 25 शेतमजुरांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे.

पीक पद्धतीत बदल केला तर शंभर टक्के शेती फायदेशीर ठरते मात्र यासाठी योग्य नियोजनाची सांगड घालावी लागते हेच दाखवून दिले आहे नंदू सोनवणे या अवलिया शेतकऱ्याने.

शेतकरी मित्रांनो गोंदिया जिल्हा खरं पाहता धान उत्पादनाचा मात्र या जिल्ह्यात आता भाजीपाला वर्गीय पिके (Vegetables Crop) देखील चांगली बहरतांना बघायला मिळत आहेत.

याचे प्रमुख कारण म्हणजे धान या पारंपारिक पिकासाठी शेतकरी बांधवांना अधिकचा उत्पादन खर्च करावा लागत होता मात्र उत्पन्न अतिशय कवडीमोल मिळत होते.

यामुळे कंटाळून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता भाजीपाला वर्गीय तसेच वेलीवर्गीय फळपीक यांसारख्या नगदी पिकांकडे आपला मोर्चा वळवला आहे.

धोबेटेकडी येथील नंदू सोनावणे यांनी देखील धान पिकाला कंटाळून कलिंगड या हंगामी पिकांची लागवड केली होती. नंदू यांनी जवळपास सहा एकर क्षेत्रात कलिंगड पिकाची लागवड केली, नंदू यांना यातून जवळपास बारा लाखांचे उत्पन्न मिळाले.

सहा एकर क्षेत्रासाठी चार लाख रुपये खर्च वजा जाता नंदू यांना कलिंगड पिकातून तब्बल आठ लाख रुपये निव्वळ नफा राहिला.

यामुळे नंदू यांचे पंचक्रोशीत नाव गाजतय अनेक शेतकरी बांधव नंदू यांच्या बांधावर हजेरी लावून त्यांच्याकडून कलिंगड शेती विषयी बहुमूल्य माहिती जाणून घेत आहेत.

कलिंगड पिकाशिवाय नंदू यांनी काटे कोहरी पिकाची देखील लागवड केली होती. नंदू यांनी आपल्या चार एकर शेतजमिनीत काटेकोहरी पिकाची लागवड केली आणि हलदीराम या कंपनीसोबत त्याचा करार केला.

काटेकोहरी पिकाची त्यांनी जानेवारी महिन्यात लागवड केली होती एप्रिल महिन्यात यापासून त्यांना उत्पादन मिळाले, काटेकोहरी पिकातून नंदू यांना सुमारे सात ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. एकंदरीत नंदू यांचा हा बदल इतर शेतकऱ्यांना देखील प्रेरणा देऊ शकतो.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office