कृषी

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, खतांच्या किमती होणार कमी

Published by
Ahmednagarlive24 Office

Agricultural News : शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आली आहे. केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी आपली तिजोरी खुली केली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणजे देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसह विविध प्रकारचे अनुदान मिळत आहे.

आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोषक तत्वांवर अर्थात खतांवर आधारित सबसिडीना मंजुरी देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत रब्बी हंगाम 2023-24 साठी (01.10.2023 ते 31.03.2024 पर्यंत) फॉस्फेटिक वर सबसिडीचा (एनबीएस) दर निश्चित करण्यात आला आहे. आगामी रब्बी हंगाम 2023-24 मध्ये एनबीएस 22,303 कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी किमतीत खाते मिळणार आहेत.

अनुराग ठाकूर

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय किंमती वाढत असताना केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगामासाठी पी अँड के खतांवर 22,303 कोटी रुपयांच्या अनुदानास मंजुरी दिली आहे.

शेतकऱ्यांना स्वस्त दरात खते मिळतील

सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खते मिळतील. या खतांची सुरळीत पणे विक्री व्हावी व शेतकऱ्यांना ते वेळेत व सोयीने ते उपलब्ध व्हावे या साठी, रब्बी हंगाम 2023-24 मध्ये खतांवर अनुदान दिले जाईल व योग्य पद्धतीने नियोजन केले जाईल असे सांगण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना आधार

शेतकऱ्यांचा खतांवर जास्त प्रमाणात खर्च होतो. त्यातून त्यांना आर्थिक भार सहन करावा लागतो. दुष्काळ किंवा ओला दुष्काळ जर पडला तर हा खर्च आणखी वाढतो किंवा पाण्यात जातो. त्यामुळे आता शासनाने खतांवर जी सबसिडी दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार भेटणार आहे.

Ahmednagarlive24 Office