कृषी

Groundnut Farming: भुईमूगची शेती म्हणजे लाखों रुपये उत्पन्नाची हमी…! फक्त ‘या’ रोगावर अशा पद्धतीने वेळीच नियंत्रण मिळवाव लागणार

Published by
Ajay Patil

Groundnut Farming: भारतातील शेती (Farming) ही सर्वस्वी पावसावर (Rain) आधारित आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकरी बांधवांसाठी (Farmer) खरीप हंगाम (Kharif Season) सर्वाधिक महत्त्वाचा ठरतो. खरीप हंगामात शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कापूस, मका, भुईमूग (Groundnut Crop) इत्यादी पिकांची शेती करत असतात.

मित्रांनो भुईमूग हे एक प्रमुख तेलबिया पीक (Oilseed Crop) आहे. यांची शेती (Agriculture) आपल्या राज्यात विशेष उल्लेखनीय आहे. देशातील गुजरात, राजस्थान, तामिळनाडू या राज्यात देखील भुईमूग शेती (Groundnut Cultivation) विशेष उल्लेखनीय आहे. खरं पाहता शेतकरी बांधवांसाठी भुईमुगाची शेती म्हणजे लाखों रुपये उत्पन्न (Farmer Income) कमवून देण्याची हमी असंच काहीस गणित आहे.

मात्र असे असले तरी भुईमुगाच्या पिकात पीक व्यवस्थापन (Crop Management) करणे अतिशय महत्त्वाचे ठरते. भुईमुगाच्या पिकात इतर पिकांप्रमाणेच वेगवेगळ्या रोगांचे सावट तसेच कीटकांचे सावट (Groundnut Disease) बघायला मिळते.

यामुळे भुईमुगाच्या पिकात आढळणाऱ्या रोगांचे वेळीच नियंत्रण करणे अतिशय महत्त्वाचे ठरते. या अनुषंगाने आज आपण भुईमूग पिकात लागणाऱ्या प्रमुख रोगांची माहिती तसेच त्यावर कशा पद्धतीने नियंत्रण शेतकरी बांधव करू शकतात याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मित्रांनो खरे पाहता खरीप हंगामात विशेषता पाऊस पडल्यानंतर पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगराईचे सावट बघायला मिळते. अशा परिस्थितीत पाऊस पडल्यानंतर पीक व्यवस्थापन करणे अतिशय महत्त्वाचे ठरते. पीक व्यवस्थापनात रोगांवर तसेच कीटकांवर नियंत्रण मिळवणे प्रमुख असते.

रोझेट रोग

बर्‍याचदा भुईमूग पिकाची लहान झाडे विषाणूजन्य रोगांनी वेढलेली असतात, ज्यामुळे पानांचा रंग पिवळा होऊ लागतो.  हा रोग ऍफिड्स किडीमुळे पसरतो. अशा परिस्थितीत या किडीवर वेळीच नियंत्रण मिळवणे अत्यंत आवश्यक आहे.

या पिकाच्या रोगाच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोरपीड 1 मि.लि. घेऊन 3 लिटर पाण्यात विरघळवून फवारणी करण्याचा सल्ला दिला जातो.

टिक्का रोग

भुईमुगातील टिक्का रोगामुळे झाडांची पाने सुकतात व गळून पडतात व झाडांना फक्त तीन देठ उरतात. या रोगाचा प्रारंभिक परिणाम पानांवर लहान गोळ्यांच्या स्वरूपात दिसून येतो, जो हळूहळू देठांवर पसरतो. त्याच्या प्रतिबंधासाठी 2 किलो डायथेन एम-45 औषध 1,000 लिटर पाण्यात विरघळवून प्रति हेक्‍टरी पिकावर फवारणी करावी. जास्त प्रादुर्भाव दिसल्यास या द्रावणाची दर 10 दिवसांनी 2 ते 3 वेळा फवारणी करावी.

रोमिल वर्म (केसाळ अळी) 

केसाळ अळीमुळे भुईमुगाच्या झाडांचे लक्षणीय नुकसान होऊ शकते. ते झाडांच्या पानांवर अंडी घालतात, ज्यातून अळ्या बाहेर पडतात आणि संपूर्ण पीक नष्ट करू शकतात.

त्याच्या प्रतिबंधासाठी, किडीचा प्रादुर्भाव किंवा त्याची अंडी दिसताच झाडांची देठं कापून जाळून टाकावीत.

ऍफिड्स कीटक 

ऍफिड्स किडीमुळे भुईमूग पिकात अनेक रोगांचा जन्म होतो. हे छोटे आणि तपकिरी किडे पानांचा रस शोषून झाडाचे नुकसान करतात. त्यामुळे पाने पिवळी होऊन कोमेजतात.

या किडीचा प्रादुर्भाव पिकावर होऊ नये म्हणून त्याच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोरपीड 1 मि.ली. मात्रा 1 लिटर पाण्यात घेऊन पिकावर फवारणी करावी.

लीफ मायनर 

भुईमुगाच्या पानांवर पिवळे डाग दिसू लागताच लीफ मायनर किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे समजावे. हे कीटक पानांना खाऊ लागतात आणि त्यावर गडद हिरव्या पट्टे देखील करतात.

त्याच्या प्रतिबंधासाठी सेंद्रिय कीड नियंत्रणाचे काम करता येते. यासाठी कडुनिंबाचे तेल आणि गौमूत्र द्रावण मिसळून ते पाण्यात मिसळून प्रति हेक्‍टरी पिकावर फवारावे. 

Ajay Patil